esakal | शिवसैनिक म्हणून ग्रामपंचयात निवडणुकीत उतरा
sakal

बोलून बातमी शोधा

Enter the Gram Panchayat elections as a Shiv Sainik

ग्रामपंचयातीच्या निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. या निवडणुकीत शिवसैनिक म्हणून ताकदीने उतरले पाहिजे. जिल्ह्यातील गावागावांत शिवसेनेचा भगवा नेला पाहिजे, अशी अपेक्षा गृह राज्यमंत्री शंभोराज देसाई यांनी आज येथे व्यक्त केली.

शिवसैनिक म्हणून ग्रामपंचयात निवडणुकीत उतरा

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : ग्रामपंचयातीच्या निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. या निवडणुकीत शिवसैनिक म्हणून ताकदीने उतरले पाहिजे. जिल्ह्यातील गावागावांत शिवसेनेचा भगवा नेला पाहिजे, अशी अपेक्षा गृह राज्यमंत्री शंभोराज देसाई यांनी आज येथे व्यक्त केली. राममंदिर चौकातील कच्छी जैनभवनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. 

आमदार अनिल बाबर, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभूते, संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

राज्यमंत्री देसाई म्हणाले,""ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक आघाडी असते. पक्षीय पातळीवर ही निवडणूक लढवता येत नाही. मात्र, राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने गावागावांपर्यंत भगवा नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता पुढाकार घेतला पाहिजे. शिवसैनिक म्हणून या निवडणुकीत उतरा. ज्या ग्रामपंचायतीत शिवसेनेची ताकद आहे, त्याठिकाणी भगवा फडकलाच पाहिजे. मात्र, अन्यत्र अधिक ताकद लावण्याची गरज आहे. शिवसेना जे बोलते तेच करते. यामुळे गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीने केलेल्या विकास कामांची कार्यपुस्तिका सर्वत्र पोहोचली पाहिजे.'' 

बानुगडे पाटील म्हणाले,""शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने कार्यकर्त्यांची जबाबदारी आता वाढली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक शिवसेना म्हणून लढवायची आहे. गावोगावी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे संघटन मजबूत करणे हाच उद्देश आहे. आगमी निवडणुकींचा हा पाया असून त्यासाठी कार्याकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.'' आमदार बाबर म्हणाले,""पक्षीय संघटन वाढविण्यासाठी या निवडणुकीत शिवसेना म्हणून उतरले पाहिजे. शिवसेनेचे ज्या गावात संघटन नाही, त्याठिकाणी अधिक बळकट करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. त्यासाठी शिवसेनेचा आमदार म्हणून सर्वोतोपरी मदत करेन.'' यावेळी ढवळी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य सिकंदर मुलाणी यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी प्रास्ताविक केले. 

अन्याय सहन करणार नाही... 
राज्यमंत्री शंभोराज देसाई म्हणाले,""शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. यामुळे शिवसैनिकांकडून विविध विभागांकडून अपेक्षा आहेत. त्याता अन्याय होणार नाही. अन्याय झाल्यास राज्यमंत्री म्हणून कदापि सहन केले जाणार नाही.'' 

पालकमंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटू....
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्यातील स्थानिक शासकीय समित्यांच्या निवडीमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर पालकमंत्री अन्याय करत असल्याची भूमिका जिल्हाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांनी मांडली होती. याप्रश्‍नावर बोलताना श्री. देसाई म्हणाले,""काही अडचणींची सोडवणूक करण्यात आली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून अडचणी मांडण्यात येतील.'' 

संपादन : प्रफुल्ल सुतार