आमदार परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

सांगली - देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून संरक्षणासाठी संघर्ष करणारे सैनिक आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चा आणि विविध संघटनांनी केली. आमदार परिचारक यांनी निवडणूक प्रचाराच्या सभेत बोलताना देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांविषयी निंदाजनक वक्‍तव्य केले. त्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. 

श्री. परिचारक यांच्या वक्तव्याचा आज सांगलीत कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील सैनिक संकुलासमोर निषेध करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटना आंदोलनात सहभागी झाल्या. आमदार परिचारक यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. सरकारने त्यांची आमदारकी रद्द करावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

विकास मगदूम, श्रीरंग पाटील, डॉ. संजय पाटील, ॲड. के. डी. शिंदे, विजय भोसले, प्रशांत पवार, योगेश पाटील, अतुल माने, प्रमोद सारनाथ, प्रा. रवींद्र ढाले आदींसह विविध संघटनांचे तरुण कार्यकर्ते सहभागी झाले.

Web Title: Enter the offense of sedition between mla paricharak