मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत प्रवेशबंदी करा : हिंदु जनजागृती समितीचा इशारा

download (4).jpg
download (4).jpg

कोल्हापूर : राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत प्रवेशबंदीचा निर्णय लागू करा, असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नये, असा इशारा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिला आहे. तसेच हा नियम राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.  

तिरुपती येथील मंदिरांसह देशातील अनेक मंदिरांत तोकड्या कपड्यांत महिला आणि पुरुष भाविकांना देवाचे दर्शन दिले जात नाही. काही मंदिरांत स्थानिक प्रथा-परंपरेनुसार पोषाखाचे नियम असतात. तसेच गाभार्‍यात जाऊन दर्शन घ्यायचे असेल, तर सोवळ्यात जावे लागते. त्यांचे तंतोतंत पालन व्हावे, अशी हिंदु जनजागृती समितीची भूमिका आहे.

सार्वजनिक जीवनात जगतांनाही अशा नियमांचे पालन करावे लागते. अनेक आस्थापने, कार्यालये येथे महिला आणि पुरुष यांच्यासाठीचा विशिष्ट पोषाख (ड्रेस कोड) ठरवून दिलेला असतो. शाळा-महाविद्यालये, पोलीस खाते, रुग्णालये आदी ठिकाणी गणवेश असतो नि विशिष्ट पोशाख असतो. तेथे सर्व नियम पाळले जातात, मग मंदिरांनी असे नियम केल्यास ते पाळण्यासाठी विरोध का केला जात आहे ? असा प्रश्न घनवट यांनी उपस्थित केला आहे. 

''मंदिरात काय असावे, काय असू नये, हे पुरोगाम्यांनी नव्हे, तर धार्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीने ठरवायला हवे. मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत आहेत. तेथील शक्ती, चैतन्य, सात्त्विकता, ऊर्जा ही भाविकांनी मनोभावे पूजा केल्याने तर मिळतेच, पण सात्त्विक वस्त्र परिधान केल्यास ती अधिक प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतो, असे अध्यात्मशास्त्र सांगते. भाविकांनी पुरोगाम्यांच्या अपप्रचाराला न भुलता धर्मपालन करावे'', असे इशारा समितीने यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com