पर्यावरणपूरक गणेशाचा 15 ऑगस्टला जागर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

सातारा - जिल्ह्यात 15 ऑगस्टला सर्वच ग्रामपंचायतींत ग्रामसभा होणार आहेत. जिल्हा परिषदेने पंचायतींना 28 विषयांवर चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन व निर्माल्याची विल्हेवाट लावून प्रदूषण टाळण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे सर्व गावांत पर्यावरणपूरक गणेशोत्सवांचा जागर होईल. 

जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे यांनी ग्रामपंचायतींना पत्रक काढले आहे. ऑगस्टमधील ग्रामसभांमध्ये गणेशोत्सवात पाणी प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा सूचना त्यात दिल्या आहेत. 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी आराखडा तयार करावा, नॅडेफ, गांडूळखत, मॅजिक पीट आदी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे हाती घ्यावीत, बाल हक्‍क संरक्षण समिती कार्यान्वित करणे यासह विविध शासकीय योजनांवर चर्चा होईल. या सूचनांच्या कार्यवाहीचा अहवाल ग्रामपंचायत विभागाकडे द्यावा, अशा सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अविनाश फडतरे यांनी दिल्या आहेत. 

गर्भलिंग निदानाविरुद्ध ठराव 
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व गर्भवती मातांची नोंदणी आशा स्वयंसेविकांकडे करणे, गावातील मुला- मुलींचा समतोल राखण्याच्या दृष्टीने गावातील एकही गर्भवती माता गर्भलिंग निदानासाठी जाणार नसल्याबाबतचा ठराव घेतला जाणार आहे. 

Web Title: Environmental Ganesha On August 15 Jagar