आटपाडी येथे सोमवारी समान पाणीवाटपाबाबत परिषद 

आटपाडी येथे सोमवारी समान पाणीवाटपाबाबत परिषद 

आटपाडी - पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांची जयंती व स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे सोमवारी (ता. 15) समान पाणीवाटप पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. भारत पाटणकर आणी आनंदराव पाटील यांनी केले आहे. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जयंत निकम, अण्णासाहेब पतकी, भारत (तात्या) पाटील, बाबूराव गायकवाड (सांगोला), हणमंतराव देशमुख, संपत देसाई (कोल्हापूर), गणेश बाबर, प्रभाकर केंगार, कृष्णा पाटील (तासगाव), शिवाजी ऐवळे, मोहनराव यादव (कडेगाव) हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

दुष्काळी भागाला टेंभूचे समान पाणी वाटप आणी निधी मिळावा यासाठी पंचवीस वर्षे लढा दिला. त्या लढ्याच्या जोरावर पाणी आले. प्रत्येक कुटुंबाला पाच हजार घनमीटर पाणी बंद पाइपने मिळावे, याला मंजुरी मिळाली. यासाठी निधी मिळवून कामाला गतीसाठी बैठका सुरू आहेत. मूळ आराखड्यातून वगळलेल्या 12 गावांनाही पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे. त्याचा आराखडा करण्याचे काम सुरू आहे.

आटपाडी बरोबर तासगाव तालुक्‍यातही समन्यायी पाणी वाटपाचा पथदर्शी प्रकल्पही जाहीर झाला मात्र संघर्ष कमी पडल्याने तेथे प्रगती झाली नाही. मार्चमध्ये 41 दिवस आंदोलन केल्याने तासगाव तालुक्‍यातील वंचित गावांना पाणी देण्याची आखणी सुरू झाली आहे. सांगोला तालुक्‍याचाही समन्यायी पाणी वाटप पथदर्शक प्रकल्पात समावेश असूनही तेथील जनतेला यापासून दूर ठेवले आहे. आटपाडीच्या बरोबरीने सांगोलाही लढा देत आहे. त्यामुळे तेथील विषम पाणी वाटपाची आखणी बदलून समान पाणी वाटपाची फेरआखणी सुरू केली आहे. आता आटपाडीचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याची मागणी आहे. त्यासाठी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. पाटणकर यांनी केले आहे. 

15 जुलै रोजी आटपाडीतील जवळे मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी 1 वाजता ही परिषद होणार आहे. मनोहर विभूते, विजय येलपले, तानाजी इंगवले, पांडुरंग जाधव, विजयसिंह पाटील, गजानन गायकवाड, शंकर गिड्डे, भीमराव व्हनमाने, लक्ष्मण खंदारे, महादेव देशमुख, पतंगराव गायकवाड, नानासो सोन्नूर, अशोक लवटे, अभिमन्यू विभूते, चंद्रकांत दौंडे, रवि लांडगे, धनाजी लेंगरे, अनिल गायकवाड, मुरलीधर पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com