विविध जातींच्या सव्वा लाख बियांचे संकलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

एरंडोली - एरंडोली (ता. मिरज) येथील प्राथमिक शाळेतील मुलींनी विविध जातींच्या सव्वा लाख बियांचे संकलन केले. हा निसर्गठेवा त्यांनी सामाजिक वनीकरण विभागाकडे सुपूर्द केला. या पावसाळ्यात बिया रुजवल्या जाणार आहेत. 

मुख्याध्यापिका आयेशा जमादार आणि शिक्षक एस. ए. रुपनूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी हा उपक्रम राबवला.

उन्हाळ्याच्या सुटीत एरंडोली परिसरातून बिया संकलित केल्या. करंज,  बाभूळ, सीताफळ, रामफळ, सुबाभूळ, लिंब, लिंबारा, आंबा, देशी बाभूळ आदी जातींच्या एक लाख २० हजार बिया गोळा केल्या. त्या स्वच्छ धुऊन वेगवेगळ्या प्लािस्टक पिशव्यांत भरल्या. काल हे संकलन वनपाल विष्णू जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी उपसरपंच आत्माराम जाधव उपस्थित होते.

या बियांतून सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेत रोपांची निर्मिती केली जाईल. यथावकाश रोपांची लागवड केली जाईल, अशी माहिती ओमासे यांनी दिली. शिक्षक रुपनर यांनी सांगितले की, विद्यार्थिनींना लहान वयातच निसर्गाची आवड निर्माण व्हावी, वृक्षसंवर्धनात रुची निर्माण व्हावी आणि निसर्गाची ओळख व्हावी या हेतूने उपक्रम  राबवला. यानिमित्ताने पुस्तकाबाहेरचे जग त्यांना माहिती झाले. 

Web Title: erandoli news 1.25 lakh seed collection