कऱ्हाड- पालिकेच्या सभापती निवडीत कुणाचे वर्चस्व राहणार ?

सचिन शिंदे
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

पालिकेच्या विविध समितीच्या सभापतीसह उपाध्यक्षपद बदलणार अशी चर्चा आहे. मात्र त्याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही मात्र ती चर्चा चुकीची आहे, असेही म्हणण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे पालिकेच्या वर्तुळात खुमासदार राजकीय चर्चा रंगू लागली आहे. पालिकेत नगराध्यक्षासह काही नगरसेवक भाजपचे आहेत. जनशक्तीचे सोळा नगरसेवक आहेत.

कऱ्हाड- येथील पालिकेत सभापती निवडीचे वेध लागले आहे. दोन्ही आघाड्यांकडून त्यासाठी फिल्डींग लावण्याचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सभापती निवडीवर जनशक्ती आघाडीचेच वर्चस्व राहिल, असे दिसते. डिसेंबरला समित्यांच्या सभापतींच्या मुदती संपत आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या निवडीत आपला नंबर लागावा, यासाठी विरोधी गटातील नगरसेवकांशीही काही नगरसेवक चर्चा करत आहेत. 

पालिकेच्या विविध समितीच्या सभापतीसह उपाध्यक्षपद बदलणार अशी चर्चा आहे. मात्र त्याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही मात्र ती चर्चा चुकीची आहे, असेही म्हणण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे पालिकेच्या वर्तुळात खुमासदार राजकीय चर्चा रंगू लागली आहे. पालिकेत नगराध्यक्षासह काही नगरसेवक भाजपचे आहेत. जनशक्तीचे सोळा नगरसेवक आहेत. तर लोकशाही आघाडीचे पाच आहेत. त्यामळे नगराध्यक्ष असुनही भाजप अल्पमतातील सत्ताधारी आहे. तर बहुमत असल्याने जनसक्ती विरोधात असुनही बहुमताच्या जोरावर अनेक निर्णय घेत आहे. लोकशाही आघाडी विकास कामासोबत तर चुकीच्या कामाच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालिकेतील सत्तास्थानांवर कुणाचे नियंत्रण नाही, जो तो आम्ही सत्ताधारी असल्याच्या आर्विभावात आहे. कोणत्या विषयावर नगरसेवक एकत्र येतील व कोणत्या विषयावरून त्यांच्यात खडांजगी होईल, ह्याचा नेम राहिलेला नाही. त्यामुळे विरोधक कोण व सत्ताधारी कोण अशी अवस्था आहे. वर्षभरात विविध विषयावर एकत्र आलेले नगरसेवक आता एकमेकाच्या विरोधात दिसत आहेत.

भाजपचा नगराध्यक्ष असल्याने जनशक्ती आघाडी त्यांना पेचात पकडून राजकीय ताकद दाखवताना दिसत आहे. जनशक्तीच्या अनेक नगरसेवकांचे भाजपच्या नेत्यांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फत सेटींग लावून स्थानिक भाजपला गप्प बसवण्याचा प्रकार होतो आहे. भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले व सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यामार्फत अनेक नगरसेवक सत्तेतील भाजपला नमवताना दिसत आहेत. त्यामुळे सत्ता असुनही त्यांच्या सोबत न जाण्याची इच्छा असूनही पालिकेतील भाजपला जनशक्तीसमोर नांगी टाकून गप्प बसावे लागताना दिसते आहे. ती स्थिती बदलण्यासाठी पालिकेत येणाऱ्या विषय समित्यांच्या निवडीत नव्या राजकिय समीकरणाचा उद्य होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विषय समित्यांवर जनशक्तीचेच वर्चस्व आहे. मात्र त्यांच्याच अंतर्गत गोटात सभापतीपदावरून मोठी खडाजंगी होणार आहे. त्यातून इष्ट हेतू साध्या करण्यासाठी भाजप तयारीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विषय समितीच्या सभापती पदावरून पालिकेत मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यातून मोठ्या राजकीय सेटलमेंट होऊन नव्या राजकीय समीकरणास सुरवात होण्याची शक्यात वर्तवली जात आहे. 

जनशक्तीची होणार कसरत
विषय समितीच्या निवडीवरून मोठा वाद होण्याची शक्याता आहे. जनशक्तीचे वर्चस्व असणाऱ्या विषय समित्यांवर नव्याने सभापती होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.  उपाध्यक्ष पदही बदलावे, असाही एक प्रवाह तयार होत आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासह सभापती निवडताना जनशक्तीचे नेते अरूण जाधव, जयवंत पाटील, राजेंद्र यादव यांची भुमिका काय राहणार यावरही बरेच काही अवलंबून आहे. 

Web Title: esakal karad municipal corporation election news