पाच वर्षाच्या चिमुकल्याचा भाऊ आणि वाहिनीने केला निर्दयी खून

संजय आ. काटे 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

श्रीगोंदे (नगर): बावीस वर्षांनी भाऊ झाला तो संपत्तीत वाटेकरी होईल म्हणून सख्ख्या भावाने बायकोच्या मदतीने झोपेत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्या बालू उर्फ वैभव पारखे याचे पाय धरले आणि डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. ही निर्दयी घटना करण्यास सांगणाऱ्या मुख्य आरोपीच्या सासुसह तिघांना पोलिसांनी अटक केली. श्रीगोंदयाचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी शांत डोक्याने तीन महिने घटनेचा तपास करून हा गुन्हा उघड केला. याप्रकरणी पोलिसांनी शांतीलाल बापू पारखे वय २७, काजल शांतीलाल पारखे वय २२ व सुनीता अंकुश तांबे शिरूर यांना अटक केली आहे .

श्रीगोंदे शहराजवळील भिंगाण येथून बालु बापु पारखे वय ५ हा १३ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून बेपत्ता होता. घरच्या लोकांनी त्याचा शोध घेतला मात्र तो न सापडल्याने श्रीगोंदे पोलिसांनी या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. घरापुढे खेळत असताना बाल्या गायब झाला असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी दिली. त्याचे आई-वडील शेती करतात. तक्रार आल्यानंतर आज सकाळपासून त्या परिसरात पोलिसांनी लोकांच्या मदतीने शोधमोहिम राबवली मात्र बाल्या मिळून आला नाही. दुपारी श्वानपथकही पाचारण करण्यात आले मात्र मार्ग सापडला नाही. सोशल मिडीयातूनही त्याविषयी पोस्ट टाकण्यात आल्या असून याप्रकरणी काही लोकांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी अज्ञात लोकांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

जाधव व पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तपासात त्याच्या घरच्या लोकांवर लक्ष केंद्रित केले आणि काही दिवसात त्याच घराजवळ बालू याचा मृतदेह मिळून आला. अतिशय सफाईदारपणे ही घटना केल्याने पोलिसही चक्रावले. मयत बालू याच्या घरी आई वडील, थोरला भाऊ, भावजय व सहा महिन्यांचा पुतण्या असे कुटुंब आहे. पोलिसांना संपत्तीच्या कारणावरून चिमुकल्याचा संपविले असेल अशी शंका आली आणि घरातील लोकांचे मोबाईल लोकेशन तपासण्यास सुरुवात केली. मात्र तरीही तपास लागत नव्हता शेवटी महावीर जाधव यांनी शांतपणे या घटनेचा उलगडा करीत गुन्हा उघड केला.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बालू हा आरोपी शांतीलाल याच्यापेक्षा बावीस वर्षांनी लहान होता मात्र तो संपत्तीत भागीदार होणार असल्याने त्याची सासू सुनीता तांबे हिने त्याचा खून करण्याचा अघोरी सल्ला दिला. शांतीलाल व त्याची पत्नी काजल यांनी बालू दुपारी झोपला असता, काजल हीने त्याचे पाय पकडले आणि शांतीलाल याने बालूच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्दयपणे खून केला. रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकून घराच्या जवळच वेड्या बाभळी असणाऱ्या ठिकाणी एका खड्यात त्याचा मृतदेह टाकून दिला.

Web Title: esakal marathi news ahmednagar news murder