कऱ्हाड- विहीरीत पडून बिबट्याचा दुर्देवी अंत

सचिन शिंदे 
बुधवार, 24 जानेवारी 2018

कऱ्हाड- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधील रासाटी- आंबेघर गावातील धनगरवाडा येथील विहीरीत पडून बिबट्याचा दुर्देवी अंत झाला. बिबट्या ज्या विहीरीत पडला. त्याला कठडा नव्हता. त्यात एक मृत मांजरही सापडले आहे. त्यामुळे त्या मांजराचा पाठलाग करत आलेल्या बिबट्याला विहीर न दिसल्याने तो त्यात पडला असावा, असाही अंदाज व्यक्त होतो आहे. त्या विहीरीला कठडे बांधण्यासाठी निधी मंजूर असतानाही ते न बांधल्याने बिबट्याचा अंत झाला. वन्य जीव विभागाच्या गचाळ कारभारामुळे बिबट्या मेल्याने वन्यजीव प्रेमींसह स्थानिक नागरीकांच्या संतप्त भावना आहेत. 

धनगरवाड्यातील सुमारे 20 फूट खोल विहार पाण्याने भरली आहे. त्या विहारीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. काल (मंगळवारी) रात्री घटना उघडकीस आली. खोल विहारीत पडलेला बिबट्या फूगून वर आला. त्यामुळे  दोन दिवसापूर्वी बिबट्या मेला असावा असा अंदाज आहे.

पश्चिम घाटावर साकारण्यात आलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये रासाटी आंबेघर गावाचा समावेश येतो. गावाजवळ असणाऱ्या धनगरवाडा जवळ 20 फूट खोल विहीर आहे. त्यात बिबट्या पडला. पाण्याच्या शोधार्थ बिबट्या आला असावा, असाही अंदाज व्यक्त होतो आहे. व्याघ्र प्रकल्पात विहीरांना मोठे कठडे बांधावेत, यासाठी श्यामाप्रसाद योजनेतून निधी मंजूर आहे. मात्र अद्यापही. ते बांधलेले नाहीत. ते न बांधल्याने वन्य जीव विभागाला नोटीसही बसली होती. मात्र तरिही गचाळ कारभार करणाऱ्या वन्य जीव विभागाच्या गचाळ कारभारामुळेच आज बिबट्याचा नाहक जीव गेला. त्यामुळे स्थानिक नागरीकांसह वन्यजीव प्रेमींमध्य संतप्त प्रतिक्रीया आहे.

Web Title: esakal marathi news leopard dead body found karad