संगमनेर : ऊसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले आढळली 

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

संगमनेर बाजार समितीचे संचालक दादासाहेब देशमुख यांच्या पिंपरणे येथील शेतात ऊसाची तोडणी सुरु आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तोडणी कामगार ऊस तोडणी करीत असताना त्यांना अचानक मांजरीच्या पिल्लांसारखा आवाज आला. त्यानंतर त्यांनी पुढे जावून पाहिले असता मांजरीऐवजी बिबट्याची तीन पिल्ले (बछडे) त्यांना दिसली

तळेगाव दिघे(जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे सोमवारी सकाळी ऊसाच्या शेतात तोडणी कामगारांना बिबट्याची मादी जातीची तीन पिल्ले ( बछडे ) आढळून आली. बिबट्याचे बछडे आढळल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.

संगमनेर बाजार समितीचे संचालक दादासाहेब देशमुख यांच्या पिंपरणे येथील शेतात ऊसाची तोडणी सुरु आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तोडणी कामगार ऊस तोडणी करीत असताना त्यांना अचानक मांजरीच्या पिल्लांसारखा आवाज आला. त्यानंतर त्यांनी पुढे जावून पाहिले असता मांजरीऐवजी बिबट्याची तीन पिल्ले (बछडे) त्यांना दिसली. त्यामुळे तोडणी कामगार घाबरुन गेले. याबाबत त्यांनी काकासाहेब देशमुख यांना माहिती दिली. देशमुख यांनी शेतात येवून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दूरध्वनीवरुन वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे वनपाल एस. आर. पाटोळे, वनरक्षक सी. डी. कासार, सुखदेव राहिंज, अरुण यादव, वाय. आर. डोंगरे यांनी घटनास्थळी येत उसाच्या शेतात प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवलेल्या तीनही पिलांना ताब्यात घेतले. उसाच्या शेतात मादी बिबट्या असण्याची शक्यता लक्षात घेता त्यास जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावला. बिबट्यांची पिल्लं पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु असल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.

Web Title: esakal marathi news Leopard sangamner news