मंगळवेढा तालुक्यात महावितरणची थकबाकी वसुलीसाठी मोहीम

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मंगळवेढा : महावितरणच्या भरारी पथकाने वीज चोरी करणाऱ्या विरूध्द कारवाईची मोहीम उघडली असून महावितरणच्या निंबोणी शाखा कार्यालयाअंतर्गत असलेल्या भाळवणीतील शेती पंपाचे सहा व एक पिठाची गिरणी अशा सात जणांवर आज कारवाई केली. त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसुल केली जाणार आहे.

तालुक्यात महावितरणची 112 कोटी थकबाकी असून वसुलीसाठी महावितरणने मोहिम सुरू केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू असून शेतकय्रांनी वोज चोरी करण्याऐवजी रितसर कनेक्शन घ्यावे शिवाय वीजचोरी विरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे सहायक अभियंता संजय शिंदे यांनी सांगितले.

Web Title: esakal marathi news mangalvedha mahadiscom news

टॅग्स