रांजणीत 'ड्राय-पोर्ट'वरून राष्ट्रवादीच्या प्रकाश शेंडेगेंचा भाजपवर निशाणा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 डिसेंबर 2017

सांगली- प्रस्तावित गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गालतच्या रांजणी (ता.कवठेमहांकाळ) येथील शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या जागेवर 'ड्राय पोर्ट  उभारणीच्या भाजपच्या प्रयत्नांना माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी कडाडून विरोध केला आहे. भाजपने धनगर समाजाच्या विकासासाठी आरक्षित असलेली जागा हडप करण्याचा डाव आखल्याचा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ही जागा सोडा, अन्यथा धनगर समाज रस्त्यावर येऊन विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला.

भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या पुढाकाराने रांजणी येथील सुमारे 2200 एकर जागेत पसरलेल्या शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या जागेवर ड्राय पोर्ट उभारणीचा प्रस्ताव आहे. त्याची प्रत्यक्ष जागा पाहणी करून मंजुरी अंतिम टप्प्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक यंत्रणा या गावाजवळून जात असल्याने ही जागा निवडल्याची भाजपची भूमिका आहे. त्याला शेंडगे यांनी कडाडून विरोध करताना लढाईचा इशारा दिला आहे.

श्री. शेंडगे म्हणाले, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्‍यात धनगर समाजातील नव्या पिढीला शेळी-मेंढी पैदास करण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करता यावे, यासाठी हा प्रकल्प माजी आमदार शिवाजीराव शेंडगे यांनी मंजूर करून घेतला. गेल्या पंचवीस वर्षात या जागेवर फार काही विकास होऊ शकला नाही, त्याला त्या-त्या वेळच्या सरकारची उदासिनता कारणीभूत ठरली. इथे कृषी विद्यापीठ झाले असते तर नक्कीच फायदा झाला असता. आता तसा प्रस्ताव पुढे आलाय, त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतू, ही जागा ड्राय पोर्टसाठी वापरली जाऊ शकत नाही, त्याला आमचा विरोधच असेल. एक इंच जागा आम्ही घेऊ देणार नाही. कारण, 2200 एकरापैकी 500 एकर जागा त्यांनी हवी आहे. तसे असेल तर रांजणीत गायरानची तेवढी जागा शिल्लक आहे. ती घ्यावी, धनगर समाजाच्या जागेवरच ह्यांचा डोळा कशासाठी?'' 

मुख्यमंत्र्यांसह पवार, गडकरी यांना भेटणार 
प्रकाश शेंडगे म्हणाले, "या प्रश्‍नावर धनगर समाज स्वस्थ बसणार नाही. आम्ही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षीय पातळीवर लढ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. ही जागा हस्तांतरीत करू नये, अशी मागणी दूग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना भेटणार आहे.'' 

दिल्लीत 100 एकर तर इथे 500 एकर का? 
प्रकाश शेंडगे यांनी या प्रकल्पाशी निगडीत काही प्रश्‍न उपस्थित केले. ते म्हणाले, "देशातील सर्वात मोठे ड्राय पोर्ट दिल्लीत तुघलकाबाद येथे आहे. ते 100 एकरावर पसरले आहे. तेथे देश-विदेशातील आवज-जावक होत असते. तेवढी जागा पुरेशी आहे. मग इथे 500 एकराचा प्रस्ताव कशासाठी?''

Web Title: esakal marathi news ncp opposes ranjani dryport