पन्हाळ्यात पर्यटकांना लुबाडणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

Crime
Crime

आपटी- पन्हाळ्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिस असल्याची बतावणी करत लुबाडणारा सागर आनंदा गराडे रा.मोहरे, ता.पन्हाळा यास पर्यटकांनी पकडून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी पन्हाळा व परिसरात कोणाच्या बाबतीत अशी वाटमारी, गाडीफोडी किंवा चोरीची घटना घडली असल्यास त्यांनी पन्हाळा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक रविंद्र साळोखे यांनी केले आहे.

याबाबत पन्हाळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोदे ता.गगनबावडा येथील रहिवाशी व संजीवन कॉलेजचा विद्यार्थी संतोष बाळू पाटील हा आपला मित्र अभिषेक याच्यासमवेत ता.२८ डिसेंबर रोजी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास दुपारच्या सुट्टीत पन्हाळा पावनगड परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी व त्यांच्या मित्रांना पोलिस असल्याची बतावणी करून इकडे का फिरता? अशी दमदाटी देऊन त्याने फिर्यादीकडून जबरदस्तीने रोख रक्कम रु.३००० व २ मनगटी घड्याळे काढून घेतली तसेच तुम्हाला घड्याळे परत देतो आणखी पैसे द्या म्हणून सांगीतले. फिर्यादीकडून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. पोलिसांच्या भीतीने फिर्यादीने याची वाच्यता कोठेही केली नाही. परंतु आरोपी फिर्यादीकडून घेतलेल्या नंबरवर वारंवार फोन करून पैशाची मागणी करू लागल्याने आज फिर्यादी आरोपीने सांगितलेल्या पुसाटी बुरुज या ठिकाणी गेले तेव्हा त्यांच्या मित्रांनी आरोपीस पकडून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले व रीतसर फिर्याद नोंदवली.

या प्रकरणी आरोपीचे कोणी साथीदार आहेत का? त्याने आज पर्यंत कितीजणांना अशाप्रकारे लुबाडले आहे. काही दिवसापूर्वी झालेली चारचाकी गाडीफोडण्याच्या घटनेत आरोपीचा सहभाग आहे का याबाबत पोलिस निरीक्षक रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस उप-निरीक्षक शशिकांत गिरी व ए.एस.आय.कोळी करत आहेत.

आरोपी हा पन्हाळा तालुक्यातीलच असून तो एका पन्हाळ्यातील जबाबदार उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा चालक म्हणून काम करत होता असे समजते. त्यामुळे त्याला पन्हाळ्यातील सर्व ठिकाणांची माहिती असल्याने व पोलिस कोणत्यावेळी कोणत्या ठिकाणी जातात याची जाण असल्याने तसेच उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे नोकरीस असल्याचा फायदा घेत अनेकांना लुबाडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com