फेसबुक फ्रेंडने ओळख वाढवून केला लग्नाचा बनाव! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सोलापूर : येथील एका तरुणाने फेसबुकवर ओळख वाढवून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तुळजापूर येथे नेऊन लग्नाचा बनाव करत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तरुणीस मागासवर्गीय असल्याने सून म्हणून आमच्या घरी शोभणार नाही असे म्हणून तरुणाच्या कुटूंबीयांनी अपमान केला. या प्रकरणात वकील पिता-पुत्र आणि मुलाच्या आईवर गुन्हा दाखल झाला आहे. 

अमित बसवराज सावळगी, वडील बसवराज सावळगी आणि आई सुशीला सावळगी (रा. नाथ संकुल अपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटलशेजारी, सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. अमित आणि त्याचे वडील बसवराज हे सोलापूर न्यायालयात वकिली करतात. मुलावर अत्याचाराचा आणि आई-वडिलांवर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित याने जोडभावी पेठ परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीशी फेसबुकवरून ओळख वाढविली. घरी कोणी नसताना शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नासाठी पैसे लागणार आहेत असे म्हणून तरुणीकडून साठ हजार रुपये घेतले. तिला तुळजापूर येथे खंडोबा मंदिरात नेऊन लग्नाचा बनाव केला. दोघे आत्याच्या घरी असतानाही शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर अमित पळून गेला. अमितच्या आई-वडिलांनी तरुणीस मागासवर्गीय असल्याने सून म्हणून आमच्या घरी शोभणार नाही असे म्हणून अपमान केला. सहायक पोलिस आयुक्त महावीर सकळे तपास करीत आहेत.

Web Title: esakal marathi news solapur facebook fraud friend