सोलापूर- दहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मिळाले "एसईओ'चे शिक्के 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 8 जानेवारी 2018

सोलापूर: महापालिकेतील नगरसेवकांना लवकरच विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) पदाची शिक्के देण्यास आजपासून सुरूवात झाली. नियोजित वेळेत शिक्के न मिळाल्याने 'सकाळ'ने सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. शिक्के मिळाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची सोय होणार असून, अधिकार मिळालेल्या नगरसेवकांनी विद्यार्थ्यांना 'प्रतिक्षा' करावी लागणार नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. 

यंदा बहुतांश माजी नगरसेवकांनी आपल्या 'विशेष'चे शिक्के जमा केले नव्हते. त्यामुळे नव्यांना शिक्के देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने नकार दिला होता. अधिकार नसताना या माजी नगरसेवकांनी साक्षांकन केले तर तो दुरुपयोग होऊ शकतो. जुन्या नगरसेवकांचे शिक्के जमा झाले नाहीत तर नव्या नगरसेवकांना शिक्के दिले जाणार नाहीत, असे पत्रच जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेस पाठविले होते. दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी अनेक दाखले लागतात. त्या दाखल्यांचे साक्षांकन करण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. शिक्के मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांची अडचण दूर होणार आहे. 

'सकाळ'ने केला पाठपुरावा 
सभागृह अस्तित्वात आल्यानंतर तीन महिने उलटूनही 'एसईओ'चे शिक्के न मिळाले नाहीत. त्याचा "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केला. विशेष कार्यकारी अधिकारी पदाची शिक्के मागण्याऐवजी "दंडाधिकारी'पदाची शिक्के देण्याचे पत्र प्रशासनाने दिले. ही बाबही उघडकीस आणल्यावर दुरुस्तीचे पत्र देण्यात आले. त्यामुळे शिक्के देण्याचे लांबले. अखेर सोमवारी शिक्के वाटण्याचे काम सुरु झाले. 
 
Web Title: esakal marathi news solapur stamp authority to corporators after 10 months