एसटी तर्फे लवकरच अत्याधुनिक कॉल सेंटर

प्रकाश तिराळे
शनिवार, 8 जुलै 2017

एसटीच्या प्रवाशांना दूरध्वनीद्वारे एसटीबद्दलचे वेळापत्रक, आरक्षण, जादा बसेस, विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने बाह्य संस्थेद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 'माहिती केंद्रे'(कॉल सेंटर ) सुरु करण्यात येत आहेत. 

मुरगूड : एसटीच्या प्रवाशांना दूरध्वनीद्वारे एसटीबद्दलचे वेळापत्रक, आरक्षण, जादा बसेस, विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने बाह्य संस्थेद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 'माहिती केंद्रे'(कॉल सेंटर ) सुरु करण्यात येत आहेत. 'प्रवाशांच्या तक्रारी व सूचनांचे तातडीने निरसन व्हावे व एसटी सेवा अधिकाधिक प्रवासीभिमुख व्हावी.यासाठी असे माहिती केंद्रे विकसित करण्यासाठी महामंडळ प्रशासनाने गतीने पाले उचललेली आहेत. 

सन २०१० मध्ये एसटीमार्फत १८००२२१२५० या निःशुल्क दूरध्वनी क्रमांकाद्वारे एक माहिती केंद्र सुरु केले आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे सदर माहिती केंद्र  (कॉल सेंटर ) प्राथमिक अवस्थेत व त्रोटक स्वरूपात सुरु आहे. एसटीतून दररोज सरासरी ६६ लाख प्रवाशी प्रवास करतात. त्यांना एसटीच्या विविध योजनांची माहिती, बसेसचे वेळापत्रक, आरक्षण अशा विविध स्वरूपाची माहिती तसेच एसटी सेवेबद्द्लच्या त्यांच्या सूचना व तक्रारी करण्यासाठी  २४ तास अविरतपणे चालणारे 'माहिती केंद्र' (कॉल सेंटर) निर्माण होणे, हि काळाची गरज होती. साय फ्युचर इंडिया प्रा. लि. या कंपनीशी एसटी महामंडळाने करार करून सदर 'माहिती केंद्र' (कॉल सेंटर ) सुरु करण्याची योजना आखली असून येत्या दोन महिन्यात आधुनिक स्वरूपात व प्रशिक्षित मनुष्यबळासह अविरत कार्यरत असणारे एसटीचे माहिती केंद्र (कॉल सेंटर ) सुरु होत आहे. 

प्रवाशांच्या तक्रारी व सूचनांचे तातडीने निरसन व्हावे व एसटी सेवा अधिकाधिक प्रवासीभिमुख व्हावी.यासाठी असे माहिती केंद्रे विकसित करणे काळाची गरज आहे.यासाठी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते प्रयत्नशील आहेत.त्यामूळे लवकरच अशी केंद्रे सुरु होणार आहेत.त्यामूळे राज्यातील एसटी च्या प्रवाशांना माहिती मिळणे अधिक सोपे होणार आहे.

Web Title: esakal news sakal news kolhapur news msrtc call centre