संगमनेर-लोणी रस्त्यावर कारमधून देशी दारूची वाहतूक ; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 21 जुलै 2017

संगमनेर-लोणी रस्त्यावरून शुक्रवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी शरीफ इजाज शेख (वय २९ रा. लखमीपुरा, संगमनेर ) हा त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या रेनॉल्ट कारमधून (क्र. एमएच १७ एझेड ४०६६) विक्रीच्या उद्देशाने देशी दारूचे बॉक्स वाहून नेत होता.

तळेगाव दिघे : संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी (ता. २१) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ४ लाखांच्या रेनॉल्ट कारसह ४९ हजार ९२० रुपये किंमतीची देशी दारू पकडली. कारसह देशी दारूचे २० बॉक्स मिळून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संगमनेर - लोणी रस्त्यावर वडगावपान शिवारातील टोलनाक्या दरम्यान ही दारू पकडण्यात आली. याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

संगमनेर-लोणी रस्त्यावरून शुक्रवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी शरीफ इजाज शेख (वय २९ रा. लखमीपुरा, संगमनेर ) हा त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या रेनॉल्ट कारमधून (क्र. एमएच १७ एझेड ४०६६) विक्रीच्या उद्देशाने देशी दारूचे बॉक्स वाहून नेत होता. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शंकर आहेर, आनंद धनवट व पो. कॉ. बाबा खेडकर यांच्या पथकाने वडगावपान शिवारातील टोलनाक्याजवळ सदर कार अडविली. सदर कारमधून ४९ हजार ९२० रुपये किंमतीचे देशी दारूचे २० बॉक्स बेकायदा वाहून नेले जात होते. पोलिसांनी देशी दारूच्या बॉक्ससह रेनॉल्ट कार जप्त केली.

प्रकरणी पो. कॉ. बाबासाहेब महादेव खेडकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी शरीफ इजाज शेख ( वय २९ रा. लखमीपुरा, संगमनेर ) यास पोलिसांनी अटक केली आहे. सदर देशी दारू कोठून व कुठे नेली जात होती ? याचा पोलीस शोध घेत आहेत.
 

Web Title: esakal news sakal news sangamner news