रत्नागिरीत हॉटेलमधील दागिने, मोबाईल  लांबविणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

मिसळ मागविण्याचा बहाणा करून काउंटरवरील सोन्याचे दागिने, मोबाईल असलेली पिशवी लांबविणाऱ्या संशयिताच्या मुसक्‍या शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डी. बी. स्कॉड) पथकाने आवळल्या. त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्‍यता आहे. 

रत्नागिरी- मिसळ मागविण्याचा बहाणा करून काउंटरवरील सोन्याचे दागिने, मोबाईल असलेली पिशवी लांबविणाऱ्या संशयिताच्या मुसक्‍या शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डी. बी. स्कॉड) पथकाने आवळल्या. त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्‍यता आहे. 

वैभव वसंत ढवळे (वय 22, रा. वाटद-मिरवणे, खंडाळा) असे त्या संशयिताचे नाव आहे. ही घटना 29 मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कुवारबाव येथील हॉटेल श्री समर्थमध्ये घडली होती. वैभवने मिसळची ऑर्डर दिली. त्यानंतर त्याने एक मिसळ पार्सल करून द्या, असे सांगितले. पार्सल तयार करण्यासाठी हॉटेलचे मालक आतमध्ये निघून गेले. मालकाची नजर चुकवून काउंटरवर ठेवलेली सुमारे 56 हजार 500 रुपयांची सोन्याचे दागिने व मोबाईल असलेली पिशवी वैभवने लांबविली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हा तपास शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण स्कॉडकडे देण्यात आला होता. 4 जुलैला संशयितास पोलिसांनी वाटद-मिरवणे, खंडाळा गावातून ताब्यात घेतले. चौकशीत गुन्हा केल्याने त्याला अटक करण्यात आली. मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मारुती जगताप, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखील डी. बी. पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस नाईक दीपक जाधव, उमेश गायकवाड, उत्तम सासवे, प्रवीण बर्गे, प्रवीण खांबे, प्रमोद गायकवाड, राहुल घोरपडे, पोलिस शिपाई महेश पाटील, सचिन कामेरकर, गणेश सावंत, रमाकांत शिंदे, महेश जेधे या पथकाने सहभाग घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला असून संशयिताकडून आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

Web Title: esakal neww sakal news ratnagiri news arrest thief