कोल्हापूरः ‘ईएसआय’चे १२ कोटी जातात कोठे?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कोल्हापूर - कामगार विमा योजनेंतर्गत (ईएसआय) वैद्यकीय उपचारांचा लाभ घेण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा झाल्यानंतर अखेर ‘ओपीडी’सेवा सुरू झाली; पण आठ महिने झाले, तरी अद्याप हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू नाही. वर्षाला १२ कोटी रुपये कामगारांच्या वेतनातून ‘ईएसआय’ कपात होते. त्याचे पैसे कुठे गेले?, असा संतप्त सवाल उद्योजकांकडून केला जात आहे.

कोल्हापूर - कामगार विमा योजनेंतर्गत (ईएसआय) वैद्यकीय उपचारांचा लाभ घेण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा झाल्यानंतर अखेर ‘ओपीडी’सेवा सुरू झाली; पण आठ महिने झाले, तरी अद्याप हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू नाही. वर्षाला १२ कोटी रुपये कामगारांच्या वेतनातून ‘ईएसआय’ कपात होते. त्याचे पैसे कुठे गेले?, असा संतप्त सवाल उद्योजकांकडून केला जात आहे.

राज्य कामगार विमा रुग्णालयातर्फे खासगी क्षेत्रातील कामगारांना अपघात किंवा विविध आजारांत उपचाराची सुविधा 
दिली जाते. केंद्र सरकारने वीस वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश नगर निगम विभागाने (बांधकाम) येथे इमारत बांधली. मात्र, तेथे १८ वर्षे रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. अनेक कामगार संघटनांनी मोर्चा, आंदोलन करत रुग्णालयाची मागणी लावून धरली. तेव्हा १ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर झाला. 

दृष्टिक्षेपात सुविधा

  •     एकूण डॉक्‍टर........................३९
  •     नियुक्त डॉक्‍टर.........................६   
  •     पॅरामेडिकलची पदे...................५४
  •     परिचारिका पदे...................... ५९ 
  •     तज्ज्ञ डॉक्‍टर.........................११  
  •     निवासी डॉक्‍टर.........................७

यातून तब्बल १९ व्याधींवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्‍टरांची ओपीडी लवकरच सुरू होणार होती. असे आठ महिन्यांपूर्वी सांगितले होते. चार महिन्यांपूर्वी येथे नवीन ओपीडी सुरू झाली. चार हॉल वॉर्ड तयार झाले. आरोग्य सुविधा देण्यासाठी खासगी कामगारांच्या वेतनातून दरमहा १५० ते २५० रुपयांची वर्गणी कपात होते. कारखानदारांकडूनही रक्कम योजनेसाठी जमा 
केली जाते. कोल्हापुरात पाच औद्योगिक वसाहती आहेत. यात दीड लाखांवर कामगार आहेत. त्यांच्याकडून जवळपास 
१२ कोटींचा निधी वर्षाकाठी पाठविला आहे. 

तरीही खासगी रुग्णालयात
खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. तसेच कामगार संघटनांनी आंदोलन केली. ‘सकाळ’ने वारंवार पाठपुरावा केला, त्याची दखल घेत केंद्र सरकारने गतवर्षी रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली सरू केल्या. त्यानंतर येथे ‘ओपीडी’ येथे सुरू आहे; मात्र गंभीर जखमींवर दीर्घ उपचारांसाठी खासगी रुग्णालयाकडे पाठविले जाते.

 

Web Title: ESI hospital issue in Kolhapur