संत विद्यापीठासाठी समितीची स्थापना - अतुल भोसले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

कऱ्हाड - संत परंपरा जागृत राहावी, यासाठी संत विद्यापीठ उभारण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यासाठी डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. 1500 लोकांची व्यवस्था असणाऱ्या भक्त निवासाचा आषाढी एकादशीला (ता. 23 जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे, अशी माहिती विठ्ठल- रुक्‍मिणी समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. भोसले म्हणाले, ""जगभर संत, साहित्य वाङ्‌मयाचा प्रसार होण्यासाठी संत विद्यापीठाची निर्मिती समिती तयार करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर असून, सहा महिन्यांत विद्यापीठ निर्मितीसाठीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन घेणे सुलभ होण्यासाठी टोकण व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पंढरपूर शहर व चंद्रभागेचा घाटाच्या स्वच्छतेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. वाळवंटात स्वच्छतागृहे, चेंजिंग रुम्स्‌ उभारण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी वॉटर एटीएमची संकल्पना राबवण्यात येणार आहे, तसेच सुरक्षेच्या कारणांतर्गत 154 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, यामध्ये सहा महिन्यांचा बॅकअप ठेवण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, आकृतीबंधानुसार भरती केली आहे. पंढरपूर देवस्थानची सुमारे 1100 एकर जमीन असून, यातील 400 एकर जमीन ही निर्विवाद आहे, तर उर्वरित जमिनीवरील वाद सलोख्याने मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.'' 

Web Title: Establishment of committee for Sant University