इथेनॉल पुरवठ्याची मोठी संधी

Ethanol
Ethanol

माळीनगर - भारतीय साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच बी हेवी मोलॅसिस व उसाच्या रसापासून उत्पादित झालेल्या 51 कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची संधी साखर कारखान्यांना मिळाली असल्याचा दावा इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) केला आहे.

चालू हंगामातील इथेनॉल पुरवठ्याच्या कालावधीतील फेब्रुवारी अखेरच्या पहिल्या तीन महिन्यांच्या काळात बी हेवी मोलॅसिस व उसाच्या रसापासून तयार केलेल्या 12 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला. यामुळे यंदाच्या हंगामात एक लाख टन साखर उत्पादन कमी होण्यास मदत झाली असल्याचे "इस्मा'चे म्हणणे आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर कारखाने बंद होऊ लागले आहेत. फेब्रुवारीअखेर महाराष्ट्रातील 23, तर कर्नाटकातील 32 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. 22 फेब्रुवारी 2019 अखेर देशात उसबिलाची थकबाकी 20 हजार 159 कोटी रुपये इतकी आहे. केंद्र सरकारने देशातील साखर उद्योगास दहा हजार कोटी रुपयांहून अधिक सॉफ्ट लोन देण्याचा घेतलेला निर्णय व साखरेचा किमान विक्री दर 31 रुपये प्रतिकिलो केल्याने ही थकबाकी लवकर कमी होईल, असे "इस्मा'ने म्हटले आहे. मात्र, केंद्राने मार्च महिन्यात साखर विक्रीचा जादा कोटा मंजूर केल्याने साखरेचे भाव प्रतिक्विंटल शंभर रुपयांनी कमी झाले आहेत. याचा उलट परिणाम होण्याची भीती "इस्मा'ला वाटते.

साखर उत्पादनात 6.8 टक्‍क्‍यांनी वाढ
चालू हंगामात फेब्रुवारीअखेर देशातील साखर उत्पादनात 6.8 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. फेब्रुवारीअखेर देशातील 466 कारखान्यात 247.68 लाख टन साखर उत्पादन झाले. मागील हंगामात या कालावधीत 457 कारखान्यांत 231.70 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

28 फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन (लाख टनांत)
राज्य 2018-19 2017-18
महाराष्ट्र 92.10 84.54
उत्तर प्रदेश 73.20 73.61
कर्नाटक 41.69 33.92
तमिळनाडू 4.70 3.58

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com