आई गेली... तरी ते प्रांताधिकारी आले ड्युटीवर

Even after the death of his mother, he came on duty
Even after the death of his mother, he came on duty

संगमनेर ः कोरोनाचे संकट राष्ट्रावर आले असताना, मातुःश्रीच्या निधनाची वार्ता धडकली. आयुष्यातील एक हळवा कोपरा गमावलेला असतानाही, राष्ट्रीय कर्तव्याला जागून, अवघ्या तीन दिवसांत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे कर्तव्यावर हजर झाले. 
प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मातु:श्री विमल यांचे मंगळवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता नाशिक येथे निधन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनादेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस व महसूल विभागात समन्वय साधण्याची कसरत सुरू असताना डॉ. शशिकांत यांच्यावर हे संकट ओढवले. घराचा एकमात्र आधार असल्याने, त्याकडे कानाडोळाही करता येणे शक्‍य नव्हते.

सहकारी अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करून डॉ. शशिकांत खासगी वाहनातून नाशिकला व तेथून रावेर येथे गेले. मातुःश्रीवर अंत्यसंस्कार केले. 
त्याच वेळी कार्यालयातील सर्व बाबींवरही त्यांचे लक्ष होते. शासन, प्रशासन, जनता आणि भावनांची सांगड घालत त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. अवघ्या तीन दिवसांत अंत्यसंस्कारानंतरचे धार्मिक विधी उरकून ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. महसूलसह सर्व शासकीय विभागांत त्यांच्या या कर्तव्यपरायणतेची चर्चा होती. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी केली.तरीही लोक घराबाहेर फिरतात. आपल्या आरोग्यासाठी  सरकारी कर्मचारी, अधिकारी स्वतःचे दुःख बाजूला सारून कर्तव्य बजावत आहेत. किमान याचा तरी लोकांनी विचार करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com