शिवेंद्रसिंहराजेंवर अन्याय झाला तरी, मीच असेन : उदयनराजे

शिवेंद्रसिंहराजेंवर अन्याय झाला तरी, मीच असेन : उदयनराजे

सातारा : अन्याय कोणावरही होऊद्या मी गप्प बसणार नाही, उद्या शिवेंद्रसिंहराजेंवर जरी अन्याय झाला तरी, मीच असेन. अनेक लोक विनाकारण अवडंबर माजवतात. मला काय पडलय. निवांत एसी गाडीत फिरू शकतो. पण लोकांवर होणारा अन्याय हृदयात खूपतो, मी स्वस्थ बसू शकत नाही. कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो अन्याय होत असेल तर, तीथे मी असणारच असे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (गुरुवार) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

जुन्या भाजी मंडईसमोरील देशी दारूचे दुकान काढण्यावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात उदयनराजेंनी गुरुवारी अटकपूर्व जामीन घेतला. त्यानंतर ते ऑफिसर्स क्लब येथे पत्रकारांशी बोलत होते. उदयनराजे म्हणाले, जे मला मान्य ते मला लागू होते. या ठिकाणी स्त्री असेल पुरुष असेल ते सर्वांना लागू होते. प्रत्येक वेळीस सारख आपल कोर्टात जायचे. हजर व्हायचे. जामीन घ्यायचा. कधी कोणी विचार केलाय का. मी जे करतो ते केलेच पाहिजे अशातला भाग नाहीये. पण माझे स्वतःचे कर्तव्य समजून करत असतो. ज्या ज्या वेळेस लोकांवरती अन्याय होतो. त्या त्या वेळेस मी माणुसकीच्या भावनेने नेहमी माझे मत मांडत असतो.

लोकशाहीत एखाद्यावर बलात्कार झाला तर किती तुमची दाद घेतली जाते. मारहाण होती. किती तुम्हांला न्याय मिळतो. मला तरी काय पडलय. काय करु मी. मी तत्वाशी बांधिल आहे. मी जे म्हणतो तेच करतो. मला काही देणघेण नाही. मला अन्याय सहन होत नाही. कोणी ही असो. शिवेंद्रराजेंवरती पण अन्याय झालेला मी खपवून घेणार नाही. आज आपण कूठल्या कुटुंबांत जन्मलो. ओके. त्या संपुर्ण मंडईमध्ये ती जागा त्या खूटाळेंची. तेथे मंडईला महिला जातात. 'ट्रक' बे याचे आरक्षण आहे. त्या ठिकाणी जागा नसताना या लोकांनी पैशाच्या जोरावर आरक्षण ठेऊन त्याच ठिकाणी देशी दारुचे दुकान चालू ठेवले. मी म्हणतो त्याच्यावरती विश्‍वास ठेवू नका. ती थिएटर होते. ते बंद पडले का तर ते सगळे डोसलतात आणि त्या ठिकाणी जाऊन हे... करतात. 

एवढी काय मोगलाई लागून गेलीय. एखादे दारुचे दुकान बंद झाल्यामुळे अनेक लोकांचे कल्याण होत असेल आणि ती जर भुमिका मी पार पाडत असेन तर काय चुकीचे काम करतोय मी. किंबहूना मला अशी अपेक्षा होती. आमदार या नात्याने माझे धाकटे बंधूराज शिवेंद्रंनी त्यांच्या या जवळच्या मित्रांना सांगायला पाहिजे होते. असे ही नाही त्यांच्याकडे जागा नाही. साईडला कोठे जागा केली असती तरी चालले असते. लोकांना नाहक त्रास होतो. कोण ऐकून घेईल. मी माझे विचार मांडले यात तुम्ही मला दोषी मानत असला तर खऱ्या अर्थाने मी दोष स्विकारतो. पण अन्याय अजिबात सहन करणार नाही. 

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, अनेक लोक इश्‍युचा नॉन इश्‍यु करतात. मला काय पडलयं निवांत एसी गाडीतून फिरत बसेन आणि दुर्लक्ष करीन. पण तसं होत नाही ना, हृदयात रूततयं ना. कोणीही असो पक्ष कोणताही असो अन्याय झाला तर वाटेल त्या परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा ही त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com