मंगळवेढा जिल्ह्यात सर्वत्र धुके, जनजीवनावर परिणाम

हुकूम मुलाणी 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मंगळवेढा - जिल्ह्यात आज बुधवार (ता.१९) पहाटे पडलेल्या धुक्याचा परिणाम शहर व ग्रामीण भागात जाणवला. सर्वत्र धुके पडल्याने दामाजी, फॅबटेक, युटोपियन, भैरवनाथ कारखान्यास ऊस गाळपास जाणारी वाहने व तोडणीवर परिणाम झाला. शिवाय सकाळच्या सत्रात कामावर जाणाऱ्या कामगारांना कामावर जाण्यासाठी धुक्याचा परिणाम जाणवला. वाहनधारकानी दिव्याच्या उजेडात रस्ता शोधला. तालुक्यातील दुष्काळाने रब्बी पिक नसले, तरी कालवा व नदीकाठच्या पिकावर मात्र पिकांवर, द्राक्ष बागा, हरभरा, ज्वारी यासारख्या पिकांवर या धुक्याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. 

दाट धुक्याने असल्याने चार - पाच फुटांसमोरीलही काहीही दिसत नसल्याने वाहने रस्त्याकडेला थांबवणे पसंत केले. शहर व ग्रामीण जनतेनी अचानक पडलेल्या धुके पहाण्याचाही आनंद सेल्फीने घेतला. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत धुक्याचा परिणाम दिसून येत होता.

Web Title: everywhere Fog in Mangleda district