प्रत्येकाने दोन वृक्ष लावून निसर्गाच्या कर्जाची परतफेड करावी - चंद्रशेखर बावनकुळे

शाहिद अली
रविवार, 22 जुलै 2018

पवनी: निसर्गाकडून प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर ऑक्सीजन श्वसनाद्वारे घेतो. परंतु निसर्गाने दिलेल्या या कर्जाचे परतफेड आपण करीत नाही. हे कर्ज फेडण्यासाठी आपल्या घरी व परिसरात कमीत कमी दोन वृक्ष लावून निसर्गाच्या कर्जाचे परतफेड करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल(२१)ला शिवाजी सायन्स कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात केले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, पूर्वी आपला देश सोन्याची चिडिया म्हणून लौकिक पावला होता. परंतु वृक्ष तोडीमुळे व औद्योगिकरणामुळे वृक्षाचा व जंगलांचा ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणाचे संतुलनावर होत आहे. ऋतु चक्र बिघडले आहे. निसर्गाच्या होणाऱ्या या ऱ्हासास आपणच जबाबदार आहेत. म्हणून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन व त्याचे संवर्धन करुन पर्यावरण संतुलनास मदत करा. आज पासून आपल्या वाडवडिलांच्या नावे तसेच प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करा, असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांनी आपल्या घरी व परिसरात 2 वृक्ष लावून सेल्फी काढावी व ती वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी. शासकीय यंत्रणांनी  नागरिकांना वृक्षाचा पुरवठा करावा. प्रत्येकांनी घरासमोर झाडे लावून या वृक्ष लागवड कार्यक्रमास प्रतिसाद घ्यावा. या कार्यास प्रथम प्राधान्य दयावे, असेही ते म्हणाले. 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी केले आहे. 1 ते 31 जुलै पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पवनी येथे 16  हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वृक्ष लागवडीमुळे पर्यावरण संतूलित राखण्यास मदत होणार आहे. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम देशातच नव्हे तर संपूर्ण जगाला संदेश देणारा आहे, असेही ते म्हणाले. 
 
Web Title: evryone should plant two Trees