"टॅक्‍स टेरेरिझम' मधूनच भाजप सरकारकडून महाभरती सुरू

"टॅक्‍स टेरेरिझम' मधूनच भाजप सरकारकडून महाभरती सुरू

सांगली -  देशात प्रचंड "टॅक्‍स टेरेरिझम' सध्या सुरू आहे. उद्योगपतींना इडी, इनकम टॅक्‍स आणि "सीबीआय' ची भिती घालून पैसे गोळा केले जात आहेत. हाच टॅक्‍स गोळा करण्याचा आंतकवाद आता राजकीय मंडळी, माजी मंत्री, आमदारांना दाखवला जातोय. दहशत, भिती, ईडीची धाडीची भिती घालून ब्लॅकमेल सुरू आहे. त्यातूनच भाजप सरकारची महाभरती सुरू असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केला. 

प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी आमदार डॉ. विश्‍वजीत कदम यांची निवड झाल्याबद्दल भावे नाट्य मंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात श्री. चव्हाण बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, आमदार जयकुमार गोरे, प्रदेश चिटणीस अलका राठोड, सत्यजित देशमुख, शैलजा पाटील, जयश्री पाटील, प्रकाश सातपुते आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. चव्हाण म्हणाले, ""भाजपने लोकसभेची निवडणूक वेगळ्या रणनितीने जिंकली. राष्ट्रीय सुरक्षा, काश्‍मिर, पाकिस्तानचा मुद्दा यावर निर्लज्जपणे धार्मिक ध्रुवीकरण केले. महात्मा गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त बनवले. "ईव्हीएम' चा मुद्दा तर आहेच. ईव्हीएम मशिन आम्ही तपासणीसाठी मागत आहोत. परंतू निवडणूक आयोग मशिन आम्हाला देत नाही. आयोगाकडे घटनात्मक जबाबदारी आहे. परंतू सध्या आयोगावर आणि निवडणूक प्रक्रियेवर विश्‍वास राहिला नाही. ईव्हीएम मशिन मिळाले तर भानगड कळेल. पुन्हा एकदा मतपत्रिकेवर मतदान घेण्याची गरज आहे. पाच वर्षाचे सरकार निवडून द्यायचे असून मतमोजणीला 48 तास लागले तर काही बिघडत नाही.'' 

ते पुढे म्हणाले, ""भाजपने माहिती अधिकार कायद्यातील स्वायत्तता काढून टाकण्याचे विधेयक मंजूर केले. त्यातून अनेक भ्रष्टाचार बाहेर आले. आज राज्यसभेत त्यांचे बहुमत नाही. त्यामुळे लोकशाहीतील संस्था मोडून टाकण्याचा उद्योग सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, निवडणूक आयोग, ऑडीट संस्थांना मोडीत काढले. अन्यायाविरूद्ध लढण्याची, शिक्षा देण्याची व्यवस्था मोडीत काढली आहे. बलात्कार करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आमदाराला अद्याप निलंबित केले नाही. कॅफे कॉफी डे च्या मालकांनी टॅक्‍सचा ससेमिरा मागे लागल्यामुळे आत्महत्या केली. "
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com