माजी नगरसेवक गवळी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

सांगली - गुंड गणेश बसाप्पा माळगे  (वय २८) याच्या खूनप्रकरणी माजी नगरसेवक राजू लक्ष्मण गवळी (वय ५०, रा. हनुमाननगर) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. खून प्रकरणातील धनंजय गवळी, सचिन गवळी, पंकज वाघमारे, प्रशांत गवळी, आदर्श वाघमारे आणि राहुल (पूर्ण नाव नाही) हे पसार आहेत. गॅंगच्या दहशतीसाठी कट रचल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.

सांगली - गुंड गणेश बसाप्पा माळगे  (वय २८) याच्या खूनप्रकरणी माजी नगरसेवक राजू लक्ष्मण गवळी (वय ५०, रा. हनुमाननगर) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. खून प्रकरणातील धनंजय गवळी, सचिन गवळी, पंकज वाघमारे, प्रशांत गवळी, आदर्श वाघमारे आणि राहुल (पूर्ण नाव नाही) हे पसार आहेत. गॅंगच्या दहशतीसाठी कट रचल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे. मृत गणेशचा भाऊ लक्ष्मण माळगे यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की खुनातील संशयित धनंजय गवळी याचा डी-मोरया नावाची गॅंग आहे. त्याचा तो म्होरक्‍या म्हणून वावरतो. काही दिवसांपूर्वी गणेश माळगे आणि धनंजय यांच्यात वाद झाला होता. हा वाद तसाच धुमसत राहिला होता. गणेशची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली होती. हे धनंजयला माहीत असल्याने  त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. आपल्या गॅंगची दहशत माजवणे आणि वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांनी हा कट रचला.

काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजता गणेशला  गवळी याच्याकडे बोलविण्यात आले. त्यावेळी गणेशसोबत ओंकार पाटील आणि प्रथमेश कदम दोन  मित्र होते. गवळी याच्या घरी गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी गवळीसह सात जणांनी गणेशला मारहाण करण्यास सुरवात केली. वाद टोकाला गेल्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत गणेश धावत सुटला. त्यावेळी हनुमाननगरच्या चौकात तो पडला. त्यावेळीही त्याच्या डोक्‍यात दगड घालण्यात आला. डोक्‍यावर, हातावर गंभीर इजा झाल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर रात्री उशिरा राजू गवळी याला ताब्यात घेण्यात आले. 

Web Title: ex corporator Ganesh Gavali arrested