स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण बुकटे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

सांगली : स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण ज्ञानोबा बुकटे (वय 94) यांचे आज त्यांच्या मळणगाव (ता.कवठेमहांकाळ) या मुळगावी निधन झाले. या स्वातंत्र्यलढ्याच्या जिल्ह्याच्या इतिहासातील आणि स्वातंत्र्यानंतर प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात झुंज देणारा एक लढवय्या हरपला. मळणगाव येथे उद्या (ता.13) माती सावडण्याचा विधी आहे. 

सांगलीच्या कारागृहाच्या तटबंदीवरून उड्या टाकून इंग्रज सरकारच्या हातावर तुरी देणाऱ्या इतिहासातील सोनेरी पानाचे कृतीशील साक्षीदार असलेले बुकटे यांनी या विरांच्या सुटकेसाठी कारागृहाबाहेर राहून नियोजन केले. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी सहभाग घेतला. बुकटे यांनी स्वातंत्र्यानंतर केलेले कार्यही तितकेच अविस्मरणीय राहिले. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील सहकारी तुकाराम रखमाजी चौगुले यांच्या बरोबरीने त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सदैव संघर्ष केला.

भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रशासकीय प्रकरणाचा पाठपुरावा केला. सांगलीतील भारती भवनातील शासकीय मालकीची जागा खुली करण्यासाठी त्यांनी लढा दिला. हुतात्मा स्मारकांच्या दुरवस्थेकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आणि त्याच्या देखभालीसाठी निधी मंजूर करण्यास भाग पाडले. नुकताच शासनाचा दोन कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या सहकारी मित्रांचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांनी संघटना स्थापनेत पुढाकार घेतला.

स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारसांचे शासन दरबारी रेंगाळलेले प्रश्‍न व त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. अंत्यविधीसाठी प्रांताधिकारी विकास खरात, तहसिलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरिक्षक प्रकाश गायकवाड शासकीय प्रतिनिधी म्हणून अंत्यविधीस उपस्थित होते. 

Web Title: ex military man balkrishna bukate expired