'विश्वजित कदमांच्या हट्टामुळेच बॅंकेची निवडणूक झाली'; माजी आमदाराची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

काहीही झाले तरी उमेदवार पडता कामा नये हे विधानही त्यांना शोभणारे नाही.

'विश्वजित कदमांच्या हट्टामुळेच बॅंकेची निवडणूक झाली'

जत : जिल्हा बँकेच्या निवडणुका बिनविरोध व्हावी सर्वांचीच इच्छा होती मात्र राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या हट्टामुळेच ही निवडणूक झाली. आता तेच मंत्री साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून निवडणूक जिंकण्याची भाषा करीत आहेत. हे लोकशाहीला काळिमा फासणारे असल्याची टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा: 24 तासांत हजर न झाल्यास सेवासमाप्ती; 268 जणांना नोटिसा

ते म्हणाले, 'पालकमंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यासह आम्ही सर्वांनीच याला संमती दिली. त्यात शेतकऱ्यांचे हित होते. मात्र विश्वजित कदम यांच्या हट्टामुळेच ही निवडणूक घ्यावी लागली. काहीही झाले तरी उमेदवार पडता कामा नये हे विधानही त्यांना शोभणारे नाही. त्याचा आम्ही निषेध नोंदवतो.'

ते म्हणाले, 'राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे सरकार आहे. तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे. मात्र, जतमध्ये झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्वजित यांनी राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे काम करावे असा उल्लेख करून त्यांनी सहकाऱ्यांवर अविश्‍वास दाखवला आहे. आमदार विक्रम सावंत यांनी जिल्हा बँकेत काय उपदव्याप केले आहेत? त्यांनी सुडाचे राजकारण केले आहे. ते चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडत आहेत.' यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील भैय्या पवार, अल्पसंख्याकचे सद्दाम भाई अत्तार उपस्थित होते.

हेही वाचा: विधानपरिषद रणधुमाळी : पाटील-महाडिकांचा लागणार कस

loading image
go to top