राजकीय खेळीतून राज ठाकरेंना ईडीची नोटीस

राजकीय खेळीतून राज ठाकरेंना ईडीची नोटीस

सांगली -  राजकीय खेळीतून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस काढली आहे. नोटीस दिलेली कंपनी दिवाळखोरीत गेलेली आहे. याकाळात केंद्र व राज्यात तीन सरकार झाली. त्यावेळी त्यांनी झोपा काढल्या काय, असा प्रश्‍नही स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना
केला.

श्री. शेट्टी म्हणाले,"" ईव्हीएम विरोधात आंदोलनामुळे भाजपला असुरक्षित वाटू लागल्याने ही नोटीस काढण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष श्री. ठाकरे यांनी ईडीने दोन दिवसापूर्वी नोटीस बजावली आहे. दादर येथील कोहिनूर मिल व्यवहाराप्रकरणी नोटीस पाठवल्याची माहिती आहे. त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजार राहाण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत शेट्टी म्हणाले,"" भाजपकडून सुडबुध्दीने राजकरण केले जात आहे. त्याचवेळी राज ठाकरे यांनी या व्यवहारातून 2008 मध्येच बाहेर पडल्याचे स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणूकीत ठाकरे यांच्याकडून ठिकठिकाणी झालेल्या सभांना मिळालेला प्रतिसाद, दुष्काळी परस्थितीत भाजप अपयशी ठरल्याने त्यांनी आवाज उठवला. आणि सध्या देशबर ईव्हीएम विरोधात वातावरण निर्मितीत श्री. ठाकरे यांच्या पुढाकार आहे. याची भाजपने धास्ती घेतल्यामुळे त्यांनी ईडीमध्ये अडकवले जात आहे.'

दिवाळखोरीतील "आयएल ऍन्ड एफएस' कंपनीच्या व्यवहारांची तपासणी सध्या "ईडी'कडून सुरु आहे. त्यात कोहिनूर मिलचा भूखंड या कंपनीसह माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलगा उन्मेश जोशी यांनी भागीदारीत घेतला होता. त्यात ठाकरेंची भागीदारी आहे. मात्र, काही काळाने कंपनीने त्यांचा
हिस्सा जोशी यांच्या कंपनीला विकला. कालांतराने "आयएल ऍन्ड एफएस'कडून 500 कोटीचे कर्ज घेतले. हे कर्ज फेडू न शकल्याने ही जागा उन्मेश जोशी यांनी या कंपनीला दिली. हा व्यवहार 2011 मध्ये झाला, मात्र त्याची नोंदणी 2017
मध्ये झाली. त्यामुळे हा व्यवहार संशयास्पद असल्याने ठाकरेंना नोटीस पाठवली जाण्याची शक्‍यता यापूर्वीच व्यक्त केली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com