साखर विक्री भ्रष्टाचाराची चौकशी मुख्यमंत्र्यानी करावी

साखर विक्री भ्रष्टाचाराची चौकशी मुख्यमंत्र्यानी करावी

कुडित्रे - महाराष्ट्र आधी दुष्काळाने होरपळला आणि आता महापूर असताना भाजप जनादेश यात्रेत आहे, अशा जनादेशास लोक घरात बसवतील. चौकशी लावायचीच असेल तर मुख्यमंत्र्यांनी साखर विक्री भ्रष्टाचाराची व मनी लॉन्ड्रिंगची ईडी चौकशी करावी, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. 

वाकरे (ता. करवीर) येथील पूरग्रस्त भेटीसाठी आले असताना ते बोलत होते. सरपंच वसंत तोडकर, उपसरपंच कुंडलिक पाटील उपस्थित होते. 

 ""हा पूर मानवनिर्मित असून महाराष्ट्रात घराची भरपाई सव्वा दोन लाख, मात्र कर्नाटकात 5 लाख कशी दिली जाते, पुराचे पाणी तेच, मात्र भरपाई अशी कशी?, पुराचा अलर्ट दिला नसल्याने सरकारच्या या गलथान कारभारामुळे हा पूर ओढवला गेला आहे.'' 

- राजू शेट्टी

केरळप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून केंद्राने 25 हजार कोटींची भरपाई द्यावी, या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. हे सरकार शेतकरी विरोधी असून 1 लाख शेतकऱ्यांना दोन वर्षे कर्ज माफी मिळाली नाही. 48 हजार कोटी लोकांना सानुग्रह अनुदान मिळाले नाही. पैसे बुडवायचे असतील तर शिवशेना, भाजपमध्ये जायचे असा कार्यक्रम सध्या चालू आहे. सरकारने हिम्मत असेल तर मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.'' 

ते म्हणाले, ""पुराने शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे, शासनाने तातडीने पुनर्वसनाचा जीआर न बदलल्यास, प्रसंगी कायदा हातात घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. या पूरपरिस्थितीला महाराष्ट्र व कर्नाटक सरकार यांचा समन्वय नसल्याचे चित्र आहे.''

आगामी विधानसभा निवडणुकीवर बोलताना शेट्टी म्हणाले, ""सर्व विरोधी पक्ष ईव्हीएम मशीन रद्द करून मतपत्रिकेवर निवडणूक मतदान घेण्यास तयार आहेत, मात्र सरकार तयार नाही, याविरोधात 28 रोजी आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.'' 

या वेळी खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वाकरे येथील पांडुरंग शिंदे, संतराम पाटील, संभाजी पाटील, नामदेव पाटील, चंदू पाटील, पंढरीनाथ पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com