बळीराजाच्या मुलांना परीक्षा शुल्क माफी

तात्या लांडगे
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

बळीराजा दिलासा म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या बळीराजाच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय झाला आहे.

सोलापूर : राज्यातील 19 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने
फटका बसला. नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर सुरु असून अतिवृष्टीने सुमारे 30 हजार कोटींहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर बळीराजा दिलासा म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या बळीराजाच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय झाला
आहे.

त्यानुसार शिक्षण उपसंचालकांकडून माहिती मागविली असून परीक्षा शुल्क माफीचा राज्यातील 13 लाख विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, लॉ, शिक्षणशास्त्र या शाखांमधून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. विद्यापीठ व त्याअंतर्गत महाविद्यालयांनी 11 नोव्हेंबरपर्यंत माहिती संचालक कार्यालयास पाठवावी, असे पत्र शिक्षण विभागाच्या सहसंचालकांना पाठविले आहे.

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचा लाभ न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाचा लाभ होणार आहे. उच्च शिक्षण विभागाने परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला असून त्यासाठी सुमारे 60 कोटींचा निधी लागणार आहे. तर माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळेल मात्र, त्याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. तरीही माहिती मागविण्यात आल्याचे उच्च शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्याची स्थिती
अतिवृष्टीने बाधित शेतकरी
26.48 लाख
परीक्षा शुल्क माफी मिळणारे विद्यार्थी (उच्च शिक्षण)
4.29 लाख
माध्यमिक व उच्च माध्यमिकचे विद्यार्थी
8.74 लाख
माफी होणारे परीक्षा अंदाजित शुल्क
99.38 कोटी

माफी दिली जाणार आहे. छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ ज्यांना मिळत नाही, अशांचा यामध्ये समावेश आहे. कला, विज्ञान, वाणिज्य, लॉ, शिक्षणशास्त्र शाखेच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिक्षण उपसंचालकांना याबाबत पत्र पाठविण्यात आले असून 11 नोव्हेंबरपर्यंत माहिती अपेक्षित आहे. - अर्चना बोराडे, प्रशासन अधिकारी, उच्च शिक्षण, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Examination fee waiver for victim's children