परीक्षार्थींची झाली कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

कोल्हापूर - महाराष्ट्र सर्कल अंतर्गत झालेल्या पोस्टल असिस्टंटची टायपिंग व विक्रीकर निरीक्षक पदाची पूर्व परीक्षा 29 जानेवारीला होत आहे. परंतु, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने परीक्षार्थींची कोंडी झाली आहे. टायपिंगची परीक्षा मुंबईला, तर विक्रीकरची परीक्षा कोल्हापूर जिल्ह्यात होणार आहे. 

पोस्टल असिस्टंटची लेखी परीक्षा 11 मे 2014 ला झाली होती. 100 गुणांसाठीच्या या परीक्षेचा निकाल 26 ऑक्‍टोबर 2014ला जाहीर झाला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये टायपिंगची परीक्षा झाली. त्याचा निकाल 8 जानेवारी 2015ला जाहीर करण्यात आला. मात्र, निकालाची पहिली यादी चुकीची जाहीर झाली आणि त्याबाबतची माहिती पोस्टाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे परीक्षेचा दुसरा निकाल 17 फेब्रुवारी 2015 ला जाहीर करण्यात आला. पहिल्या यादीत नाव असणारे परीक्षार्थी दुसऱ्या यादीत नव्हते. त्यामुळे टायपिंग परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाला असून, परीक्षा 29 जानेवारीला दुपारी अडीच ते चार या वेळेत मुंबईत होणार आहे. 

विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षाही याच दिवशी सकाळी साडेदहा ते बारा या वेळेत आहे. ज्यांची टायपिंगची परीक्षा मुंबईला आहे, त्या विद्यार्थ्यांना विक्रीकर निरीक्षक पदाची पूर्व परीक्षा द्यायची आहे. परंतु, त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा देणे शक्‍य नसल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर आहे. विक्रीकर निरीक्षक पदासाठी परीक्षार्थींनी कसून अभ्यास केला आहे. टायपिंग परीक्षेची तारीख बदलली, तर दोन्ही परीक्षा देणे सोपे जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: examinee in strain