तंत्रशिक्षणाला सध्याच्या काळात चांगलेलच महत्त्व - डॉ. आनंद पवार

education
education

पारनेर - तंत्रशिक्षण केवळ नौकरी मिळवण्यासाठीच नव्हे तर इतरांना नौकरी देण्यासाठी ही ऊपयोगी पडते. तंत्रशिक्षणातून स्वताःचा ऊध्योगही सहज करता येतो. त्यामुळे हे शिक्षण स्वताःपुरते मर्यादीत न रहाता यातून आपणा दुस-यालाही रोजगार देऊ शकते. सध्या तंत्रशिक्षणाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे उप-सचिव डॉ. आनंद पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई व श्री समर्थ तंत्रनीकेतन म्हसणे फाटा येथे राज्यस्तरीय तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. 

या वेळी निलेश लंके, रविंद्र तरवडे, डिझाईन डायरेक्टर अभय वाबळे, प्राध्यापक विष्णू भुजबळ, साईकृपाचे प्राचार्य बाळासाहेब दळवी, प्राचार्या शिल्पा गाडीलकर, कॅप्टन नीता भुजबळ, ओम कॉम्पुटरचे काळे, प्रविण शेरकर, समन्वयक शशिकांत रासकर यांच्यासहशैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. पवार पुढे म्हणाले, पुस्तकी ज्ञानापुरते तंत्रशिक्षण न ठेवता या शैक्षणिक वर्षापासून औद्योगीकरणासाठी जे व्यवसायिक शिक्षण गरजेचे असते त्यातील ७० टक्के शिक्षणाचा अभ्यासक्रमात सामावेश केला आहे. हा मेळावा मार्गदर्शन मेळावा नगर जिल्हासाठी ठेवण्यात आला आहे.  यामाध्यमातून इयत्ता १० वी १२ वी नंतर काय या साठी विविध पदविका अभ्यासक्रमाची माहिती व्हावी मुलांना त्यानंतर कोणकोणते पर्याय आहेत याची माहिती या मेळाव्याच्या माध्यमातून मुलांना मिळणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना ही संधी या कॉलेजाने मिळवून दिली आहे. औद्योगिकी करणामध्ये ६०ते ७० टक्के प्रात्यक्षिक शिकवण्यावर भर नवीन अभ्यासक्रमात दिला आहे. त्यामुळे पदवीका अभ्यासक्राच्या माध्यमातून चांगला उद्योग व्यवसाय करता येऊ शकतो. या तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृती देण्याची योजना आहे.या वेळी रविंद्र करवंदे, अभय वाबळे यांनीही मार्गदर्शन केले.

प्राचार्य किशोर जाधव यांनी प्रास्ताविक तर आभार संचालक कैलास गाडीलकर यंनी मानले. सूत्रसंचालन प्राचार्या डॉ. अरूणा भांबरे यांनी केले.

सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये मोठमोठे उद्योग येत आहेत. मेक इन इंडियाच्या माध्यमातून भविष्यकाळात जापनीज औद्योगिक वसाहतीमध्ये २१७ उद्योग सुरू होत आहेत. तेथे अनेकांना रोजगार मिळणार आहे ती संधी म्हसणे फाटा येथील समर्थ तंत्रनीकेतन संस्थेच्या माध्यमातून  संधी उपलब्ध होणार आहे.
- कैलास गाडिलकर. संचालक श्री. समर्थ कॉलेज म्हसणे फाटा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com