दहिवडीतील दिव्यांग खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

रुपेश कदम
गुरुवार, 29 मार्च 2018

मलवडी (सातारा) : अपंग कल्याण व पुर्नवसन संस्था, दहिवडी संचलित 'अस्थिव्यंग मुलांची निवासी शाळा, दहिवडी' या शाळेच्या दिव्यांग मुलांनी 'सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग, मंत्रालय' व 'अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे' यांचे वतीने दिनांक २३,२४,२५ मार्च रोजी देवरी (जिल्हा गोंदिया) येथे घेण्यात आलेल्या शासकीय राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.

नागेश बंजत्री याने 50 मीटर फ्री स्टाईल पोहणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक जिंकले. चेतन करचे याने 25 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक तर परशुराम नलवडे याने 50 मीटल धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांकासह कास्य पदक जिंकले.

या सर्व दिव्यांग खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवून पुन्हा एकदा माणचा डंका राज्यभर वाजविला. या खेळाडूंवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या खेळाडूंचा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रल्हाद देवकुळे व संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने सत्कार केला.  या खेळाडूंना मुख्याध्यापक श्रीराम गोफणे, शिक्षक सुलिंदर दुबळे, मनिषा काशिद, जितेंद्र लाटणे, सचिन देवकुळे, राहुल लोखंडे, अकुंश भोसले यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Excellent performance in the state-level sports competition of handicapped