आरोग्य विभागात खळबळ : इस्लामपूरात आरोग्य विभागाचे अधिकारी कोरोना बाधित

धर्मवीर पाटील
Friday, 21 August 2020

दोन दिवसांपूर्वी शहरातील तहसील कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता

इस्लामपूर ( सांगली) : नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचाच अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह संपूर्ण पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे. संबंधित अधिकारी 'ऍक्टिव्ह' असल्याने अनेकांशी संपर्क आला असण्याच्या शक्यतेने घबराट निर्माण झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी शहरातील तहसील कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, शिवाय त्याच दिवशी शहरातील एक नामांकित डॉक्टर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक नगरसेवक यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे वातावरण बिघडले आहे.

हेही वाचा- इस्लामपुरात पुन्हा तीन दिवसाचा कडक लाॅकडाऊन -

शहरातील रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन पदाधिकारी, प्रशासनाने 23 ऑगस्ट पासून सलग तीन दिवस संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आज पालिकेच्या अधिकाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा खळबळ माजली आहे. याबाबत पालिका प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सकाळ'ला सांगितले.

हेही वाचा-मिरजकरांनी ठरवलं....गणेशोत्सव साधेपणानेच -

आमदार गाडगीळ व त्यांच्या पत्नीस बाधा
दरम्यान, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व त्यांच्या पत्नी यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

हेही वाचा-फुलांचे क्षेत्र कमी; गणरायाच्या स्वागताला फुलांचा तुटवडा -

सांगली जिल्ह्याची स्थिती 
 आजचे बाधित    ३४१
 उपचाराखाली रुग्ण    ३१३८ 
 बरे झालेले रुग्ण    ४३३६
 मृत्यू झालेले रुग्ण    २७६ 
 एकूण बाधित    ७७५० 
 चिंताजनक रुग्ण    ३३२
 ग्रामीण भागात बाधित    २५३९
 शहरी भागात बाधित    ५९८
 मनपा बाधित    ४६१३

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excitement in health department health department officer corona infected in Islampur