दिवाळीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सोलापूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या. मात्र, आता या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. "राज्य मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीपर्यंत करण्यात येणार आहे'', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) दिली.  

सोलापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यापूर्वी नवरात्रीदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीपर्यंत विस्तार केला जाणार असल्याचे सांगितल्याने मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता त्यांनी सांगण्यास नकार दिला होता. 

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले.

Web Title: Expansion of Cabinet will be till Diwali says Chief Minister Devendra Fadnavis