esakal | मुलावर मारहाणीचे आरोप; सदाभाऊ खोत यांनी दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

मुलावर मारहाणीचे आरोप; सदाभाऊ खोत यांनी दिलं स्पष्टीकरण

तांबवे येथे जी घटना घडली त्याचे व्हिडिओ शुटिंग माझ्याकडे आहे. त्यात सागर कुठेही दिसत नाही.

मुलावर मारहाणीचे आरोप; सदाभाऊ खोत यांनी दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : तांबवे (ता. वाळवा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. या प्रकरणात आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत याने मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. त्याबाबत सदाभाऊ खोत यांनी ‘या प्रकरणात सागर खोत हाणामारीच्या ठिकाणी नव्हताच. तो एका ठिकाणी जेवायला गेला होता. त्याचे व्हिडीओ फुटेज आमच्याकडे आहे. स्वाभिमानीने नाहक राजकीय स्टंटबाजी करू नये’, अशी भूमिका मांडली आहे.

हेही वाचा: '..अन्यथा तुमच्या घरावरही दगडं पडायला वेळ लागणार नाही'

तांबवे येथील रविकिरण माने या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याने पोलिसांत फिर्याद दिली असून सागर खोत यांच्यासह चौघांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्याबाबत आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, ‘‘तांबवे येथे जी घटना घडली त्याचे व्हिडिओ शुटिंग माझ्याकडे आहे. त्यात सागर कुठेही दिसत नाही. शिवाय, तो जेवायला एका शाळकरी मित्रासोबत गेला होता, त्याचेही शुटिंग आहे. तो हाणामारीत असता तर आम्ही हात वर केले नसते. करून सवरून पाठ दाखवणारे आम्ही नाही. जे केले नाही, त्याबाबत नाहक आरोप सहन करणार नाही. स्वाभिमानीच्या कार्यकत्यांनी आणि नेत्यांनीही हा वाद कौटुंबिक पातळीवर नेण्याचा हीन प्रकार करू नये.’’

हेही वाचा: सदाभाऊ खोत यांच्या मुलाकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण

ते म्हणाले, ‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही वाढवली. त्यात तयार ताटावर बसलेले काही लोक वाचाळपणा करत आव्हान देत आहेत. त्यांनी ही भाषा करू नये. आंदोलने आम्हाला नवीन नाहीत. तुमच्याकडे पुरावे असतील तर सादर करा. सागर तेथे नव्हता हे आम्ही सिद्ध करून दाखवतो. राजकीय स्टंटबाजी करून काही होणार नाही. खोटे बोलण्याला काही मर्यादा असते.’’

loading image
go to top