मराठा आरक्षणाबाबत भूमिका लवकर स्पष्ट करा - संभाजीराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सोलापूर - कोणत्याही समाजावर अन्याय करून त्यांचे आरक्षण काढून आम्हाला आरक्षण नकोय. परंतु, आरक्षण तर मिळायलाच हवे. त्यासाठी सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले. 

सोलापूर - कोणत्याही समाजावर अन्याय करून त्यांचे आरक्षण काढून आम्हाला आरक्षण नकोय. परंतु, आरक्षण तर मिळायलाच हवे. त्यासाठी सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, हीच योग्य वेळ आहे, असे आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले. 

मराठा तितुका मेळाव्याचे आयोजन बोरामणी येथे केले होते. त्याप्रसंगी खासदार संभाजीराजे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण होते. याप्रसंगी आमदार भारत भालके, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, रश्‍मी बागल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालिका रश्‍मी बागल, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, परिहवन समितीचे माजी सभापती राजन जाधव, विद्यमान सभापती तुकाराम मस्के, संतोष बोबडे, भगवान भोसले, सज्जन निचळ, लक्ष्मण महाडिक, चांगदेव काशीद, प्रा. संजय जाधव आदी उपस्थित होते. यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील यांची कन्या हौसाबाई पाटील, हाजी इम्तियाज पिरजादे, हणपंत गवळी, कृष्णात पवार, संभाजीराव शिंदे, नागेश कांबळे, राजकुमार काशीद व माऊली पवार यांना खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते मराठा मित्र पुरस्कार देण्यात आले. 

खासदार श्री. भोसले पुढे म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा घेवून आम्ही काम करत आहे. मी भाजपचा नव्हे तर जनतेचा खासदार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हेच माझे ध्येय असून बहुजन समाजाचेही प्रश्‍न सरकारने सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाने त्यांच्या न्याय, हक्‍कासाठी मोठ-मोठे मुक मोर्चे काढले. मात्र, सरकारला त्याचे काहीच देणेघेणे नाही. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. परंतु, सरकारने याची वेळेत गंभीर दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे. 
सिध्दाराम म्हेत्रे, आमदार 

मराठा समाजाच्या सहनशिलतेचा सरकारने अंत पाहू नये. सरकारने आरक्षणाबाबत चालढकल करू नये, कोणत्याही समाजाच्या हक्‍कासाठी सरकारला का वेळ लागतो. विविध समित्या नियुक्‍त करून न्यायालयाचे कारण पुढे केले जाते. परंतु, आता सरकारने वाट न पाहता लवकर आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी आमदार भारत भालके आणि आमदार मधुकरराव चव्हाण यांनी यावेळी केली.

Web Title: Explain the Status Maratha reservation