कृषी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ

हेमंत पवार
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

-  राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय कृषी महाविद्यालयातील प्रवेशाचा आज शेवटचा दिवस होता.

- मात्र पुरस्थिती निर्माण झाल्याने, महामार्गासह अनेक राज्यमार्गही बंद झाल्याने प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंत पोचणेही अवघड झाले आहे.

कऱ्हाड : राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय कृषी महाविद्यालयातील प्रवेशाचा आज शेवटचा दिवस होता. मात्र पुरस्थिती निर्माण झाल्याने, महामार्गासह अनेक राज्यमार्गही बंद झाल्याने प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयापर्यंत पोचणेही अवघड झाले आहे.

त्यासंदर्भात कृषी महाविद्यालयांनी पुरस्थितीची वस्तुस्थीती सांगुन कृषी विद्यापीठांना प्रवेशाची मुदत वाढवण्यासंदर्भात विनंती केली होती. त्याचा विचार करुन शासनाच्या कृषी विभागाने राज्याच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेस १३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे कृषी प्रवेशासाठी आता मुदतवाढ मिळाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्तीचा विचार करुन कृषी विभागाने प्रवेशासाठी १३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवेश मिळणार नाही म्हणुन जीव टांगणीला लागलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील महापुराच्या स्थितीचा विचार करुन विद्यार्थ्यांचे नुकसान होवु नये म्हणुन आम्ही शासकीय कृषी महाविद्यालयामार्फत कृषी विद्यापीठाच्या रजिष्ठार यांना संबंधित पुरस्थितीची माहिती दिली. त्याचबरोबर पुरामुळे एसटीसह सर्वच वाहतुक बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पोचता आलेले नाही. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची गरज असल्याचे कळवले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension in the admission process of agricultural colleges