पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ 

संतोष सिरसट
सोमवार, 23 जुलै 2018

बिगर कर्जदार शेतकरी खरीप हंगामासाठी आता 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. यापूर्वी ही मुदत 24 जुलैपर्यंत होती. 
 

सोलापूर - यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठीच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बिगर कर्जदार शेतकरी खरीप हंगामासाठी आता 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. यापूर्वी ही मुदत 24 जुलैपर्यंत होती. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी असे दोन घटक केले आहेत. यंदाच्या शासन निर्णयान्वये दोघांसाठीही विमा भरण्याची तारीख वेगवेगळी दिली होती. मात्र, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास काहीतरी तांत्रिक अडचणी येऊ लागल्याचे सांगत शासनाने त्यांना विमा भरण्यासाठी आता 31 जुलैपर्यंतची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदार शेतकऱ्यांना सुरवातीलाच 31 जुलैपर्यंत अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. कर्जदार शेतकऱ्यांप्रमाणे बिगर कर्जदार शेतकरीही आता 31 जुलैपर्यंत विमा हप्ता भरू शकणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Extension to fill Pik Vima