जनावरांना बारकोड प्रणाली करण्यासाठी 22 मे पर्यंत मुदतवाढ

cow.jpg
cow.jpg

मंगळवेढा : तालुक्यात सुरू असलेल्या जनावरांच्या छावण्यात जनावराला बारकोड प्रणाली करण्यासाठी 22 मे पर्यंत मुदतवाढ दिली असून छावणीतील सर्व जनावाराला बारकोड प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना छावणी चालकांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.

सध्या तालुक्यांमध्ये जनावरांच्या 54 छावण्यांमधून तीस हजार पेक्षा अधिक जनावरे छावणीत दाखल असून पाच वर्षांपूर्वीचा छावणीत चालकाने छावणीत गोलमाल केला. त्यामुळे महसूल खाते यंदा सतर्क झाले असून प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित अंमलबजावणी करून घेत आहे. त्यामुळे कोणत्याही छावणी चालकाला यात गैरव्यवहार करण्यास अजिबात संधी नाही.

सध्या छावणी मध्ये जनावरांना हिरवा चारा, पशुखाद्य, वैद्यकीय सुविधा, पाणी आणि अन्य सुविधा देताना दमछाक होत असून मिळणारे अनुदान हे तोकडे असल्यामुळे छावणी चालक मेटाकुटीला आले. त्यात छावणीला विविध मंत्री, अधिकाऱ्यांच्या ठेवलेल्या  वारंवार भेटी, कमी काळात या सुविधा देताना नाकीनऊ आले आहे.त्यात प्रती जनावर छावणी चालकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या तोकड्या अनुदानात तालुक्याबाहेरून आणावा लागणारा हिरवा चारा आणि पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे सर्व सोयी देणे परवडत नाही. त्यामुळे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील दौऱ्यामध्ये प्रति जनावर अनुदानात वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार 16 मे 2019 अनुदान वाढीचा निर्णय शासनाने घेतला. त्यामध्ये  शंभर रुपये आणि पन्नास रुपये इतके अनुदान वाढ आले करण्यात आले आहे.
 

याशिवाय जनावरे स्कॅन करण्यासाठी लागणार वेळ विचारात घेता आता आठवड्यातून एकदाच हजेरी घ्यावी लागणार आहे. जनावराची बायोमेट्रीक प्रणालीवर हजेरी घेतली जाणार आहे.

''चारा छावणी चालकांचे अनामत रक्कम 5 लाख रुपये झाली. मात्र ही अट केवळ यापुढे मान्यता मिळणाऱ्या छावण्यासाठी आहे'', अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com