उन्हाळी सुट्यांसाठी  एसटीतर्फे जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

सातारा - परीक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना आता सर्वांनाच वेध लागलेत उन्हाळी सुटीचे. विद्यार्थ्यांना मामाच्या गावाला जाण्याचे किंवा नोकरदारांना गावाकडे येण्याचे. काही जण छोट्या सहलींचेही नियोजन करीत आहेत. या सर्वांच्या सोयीसाठी एसटीच्या सातारा विभागाने यंदाही काही जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. 

राज्य परिवहन महामंडळाने सातारा विभागातून ३० जूनपर्यंत सुमारे ७० जादा बस विविध ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये साताऱ्याहून पुण्यासाठी प्रत्येक १५ मिनिटाला, कऱ्हाडहून लातूरला, विजापूर, सोलापूर, फलटणहून कोल्हापूर आदी ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त साताऱ्याहून महाबळेश्‍वर, महाबळेश्‍वरहून प्रतापगड तसेच रायगड दर्शन अशी सेवा प्रवाशांना मिळणार आहे. सातारा आगारातून ०७, कऱ्हाड ०८, कोरेगाव ०५, फलटण ०३, वाई ०९, पाटण ०३, दहिवडी ०२, महाबळेश्‍वर १०, मेढा ०५, पारगाव-खंडाळा ०६, वडूज ०७ अशा जादा बस सोडण्यात येणार आहेत. या हंगाम कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली. 

Web Title: Extra Bus for summer vacations by ST