बहुमजली पार्किंग, पर्यटक निवासाचा मार्ग मोकळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

कोल्हापूर - जुना पूल व संभाजी पुलामध्ये अालेल्या गाडी अड्डा या जागेवर बहुमजली पार्किंग व पर्यटक निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या जागेचा वापर सध्या भंगार मार्केट व भंगार कचरा डेपोसारखा सुरू आहे. या ठिकाणी तात्पुरत्या तत्त्वावर २० स्क्रॅप व्यावसायिकांना खोक्‍याच्या स्वरुपात जागा दिली आहे, पण त्याचा गैरफायदा घेत जो या जागेत भंगार टाकत नाही तो आळशी अशी परिस्थिती आहे.

या पार्श्‍वभूमीवर आता ही जागा बहुमजली पार्किंग व पर्यटक निवासासाठी वापरण्यात येणार आहे. यापूर्वीचे विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांनी प्रत्यक्षात 

या जागेवर पाहाणी करून आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. सध्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनीही काल जागेची पाहणी करून कामाला प्रारंभ करण्याच्या सूचना दिल्या. या ठिकाणी बहुमजली पार्किंग होणार असल्याने महालक्ष्मी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने मंदिराजवळ न येता गाडी अड्ड्यातच थांबवता येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडीचा प्रश्‍न कमी होणार आहे. तसेच पर्यटकांसाठी रहाण्याचीही मध्यवर्ती ठिकाणी सोय होणार आहे. तेथून दहा मिनिटांत चालत महालक्ष्मी मंदिरापर्यंत जाता येणार आहे.

Web Title: Extreme parking, open the way for tourist accommodation