अय भंगार क्वॉलिटीच्यांनो ः आधी बघा, महाराज काय करतात ते...मग टापा हाना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

आय सपोर्ट इंदोरीकर महाराज असे कॅम्पेन चालविले जात आहे. तर एक करोड मराठ्यांच्या ग्रुपवरही महाराजांच्या बाजूने लोकांनी लढा उभारला आहे. मराठा क्रांती मोर्चातील काही शिलेदारांनीही इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दिला आहे. 

नगर ः निवृत्तीमहाराज इंदोरीकर यांना काहीजणांनी संततीबाबत विधान केल्याचा आरोप करीत कोर्टात खेचण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याबाबत त्यांना नोटीसही पाठविण्यात आले आली आहे. मात्र, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने सोशल माध्यमातील लोक उभे राहिले आहेत. आय सपोर्ट इंदोरीकर महाराज असे कॅम्पेन चालविले जात आहे. तर एक करोड मराठ्यांच्या ग्रुपवरही महाराजांच्या बाजूने लोकांनी लढा उभारला आहे. मराठा क्रांती मोर्चातील काही शिलेदारांनीही इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दिला आहे. 

 

indurikar maharaj

खाली खेचण्याचा धंदा 
महाराज हे वारकरी संप्रदयाचे वैभव आहेत. उच्च शिक्षित असलेल्या महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे. ते एम.ए. ग्रॅज्युएट आहेत. कुठलाही मराठी माणूस पुढे जात आसताना त्याची मानहानी करून किंवा त्याच्याविरोधात षढयंत्र करण्याचा धंदा वाढीस लागला आहे. 
त्याचाच एक भाग म्हणून महाराजांची बदनामी केली जात आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता त्यांच्या मागे आहे. आम्हीही रस्त्यावर उतरून त्यांना पाठिंबा देणार आहोत, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. 

गुरूचरित्र वाचा.. 
इंदोरीकर महाराज जे काही वाक्‍य बोलले आहे ते या गुरुचरित्रात दिलेल्या 37 व्या अध्यायाच्या संदर्भाने... माहितीसाठी ओवी क्रमांक 51 पासून वाचून बघावी. महाराजांना बदनाम करून ज्याला मोठ व्हायचं असेल त्यांनी जरूर मोठ व्हावं. महाराजांचे वाक्‍य तोडूनमोडून दाखवून फुकटची प्रसिद्धी घेऊ नये. 

महाराजांची समाजसेवा बघा, मगच.. 
महाराज कीर्तनात समाजप्रबोधन करतात. कित्येक तरुणांची व्यसनमुक्ती केली. गावागावातील वराती बंद करून कीर्तन चालू केले. अनाथ मुलांसाठी दहावीपर्यंत मोफत शाळा चालवतात. राहिला प्रश्न महिलांचा तर स्त्री भ्रूण हत्या, लेक वाचवा लेक शिकवा यासारख्या विषयावर कीर्तनातून समाजप्रबोधन करतात.

आरं काय बोल्ता तुम्ही

काही महाशय महाराज कीर्तनाचे 2 ते 3 लाख रुपये घेतात. आरोप करणाऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवावं. महाराज कधीच कीर्तनाची रक्कम ठरवत नाही. लोक देतील ती रक्कम स्वीकारतात. त्यातून पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यालय एक रुपयाची फी न घेता चालवतात.

शाळा चालवतात तीसुध्दा फुकट

विनाअनुदानित शाळा असल्याने सर्व शिक्षकांचा पगार स्वतः करतात. अनाथ मुलांसाठी अनाथ शाळा चालवतात. या सारख्या अनेक समाजयोगी काम महाराज करीत असतात. तेव्हा उगच स्वतः मोठ होण्याच्या नादात महाराजांना बदनाम करू नका, अशी कळकळीची विनंती करणारेही संदेश पाठविले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eye Support Indorekar Maharaj: First, see what Indorekar Maharaj does