फॅबटेक कॉलेजने उचलली आत्महत्याग्रस्त मुलीच्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी

दत्तात्रय खंडागळे
गुरुवार, 28 जून 2018

संगेवाडी (सोलापूर) : पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार गावात वडिलांच्या कर्जबाजारीपणामुळे कॉलेजमधील फी भरु शकत नसल्याने आत्महत्या केलेल्या मुलीच्या बहिणीच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या खर्चाची सर्व जबाबदारी फॅबटेक कॉलेजने (ता. सांगोला, जि. सोलापूर) घेतली.

संगेवाडी (सोलापूर) : पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार गावात वडिलांच्या कर्जबाजारीपणामुळे कॉलेजमधील फी भरु शकत नसल्याने आत्महत्या केलेल्या मुलीच्या बहिणीच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या खर्चाची सर्व जबाबदारी फॅबटेक कॉलेजने (ता. सांगोला, जि. सोलापूर) घेतली.

कर्जबाजारीपणाने त्रासलेल्या वडिलांवर शिक्षणाच्या वाढलेल्या खर्चाचा भार नको म्हणून १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची दुःखद घटना पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार गावात घडली. डिप्लोमाचे शिक्षण घेत असलेल्या अनिशा लवटे हिने हे टोकाचे पाऊल उचललं. ईश्वर वठार गावात हनुमंत लवटे यांच कुटुंब एक एकर शेतीवर आपली उपजिविका भागवत होत. सलग दोन वर्ष दुष्काळ आणि त्यानंतर झालेली गारपीट यामुळे त्यांच्या एक एकर शेतीतील द्राक्षाची बाग जळून गेली होती. यामुळे घरावरील कर्ज वाढत चालले होते. लवटे यांनी आपल्या तीनही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले होते. शेतीत झालेले नुकसान, त्यामुळे वाढलेले कर्ज यातच या तीनही मुलांच्या शिक्षणामुळे वडिलावरील कर्ज वाढत असल्याची भावना अनिषाची झाली होती. ती तासगाव येथील कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. यातूनच तिच्या फीच्या रक्कमेची तजवीज न झाल्यामुळे, वडिलांची परवड असह्य झाल्यामुळे अखेर अनिषाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

त्यांची मोठी मुलगी फॅबटेक इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकत आहे. ही बातमी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर भाऊसाहेब रुपनर यांना कळताच तातडीने त्यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्या मुलीच्या पालकांचे सांत्वन केले. व मोठ्या मुलीच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या खर्चाची सर्व जबाबदारी आपण घेत आहे. आपण निश्चिंत रहावे असे सांगून त्यांना तसे लेखी पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रा. सुभाष माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिरुद्ध महात्मे, उपप्राचार्य प्रा. तात्यासाहेब जगताप स्टुडन्ट डीन वेल्फर प्रा. शरद पवार, फॅबटेक पब्लिक स्कूलचे सीईओ प्रा. अभिजित नष्टे आदी उपस्थित होते.

आमच्या कॉलेजमधील असलेल्या विद्यार्थीनीच्या बहिणीने आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या केली. ही बातमी समजताच आम्ही आमच्या कॉलेजमधील मुलीची जेवणासह अभियांत्रीकीच्या शिक्षणाची पुर्ण जबाबदारी आम्ही स्विकारली आहे.
-  भाऊसाहेब रुपनर (मॅनेजिंग डायरेक्टर, फॅबटेक कॉलेज, सांगोला)

Web Title: fabtech college takes responsibility of sister of girl who suicides