फेसबुक पोस्टच्या वादातून गमवावा लागला तरूणाला जीव

crime1
crime1

मंगळवेढा (सोलापूर) : फेसबुक पोस्टवरून झालेल्या वादातून शहरातील सचिन कलुबर्मे या युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. मारेकरी हे देखील त्याचे शेजारीच असले तरी यावरुन भविष्यात असे प्रकार होणार नाहीत याकडे पोलीसांनी देखील गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अन्यथा संतांची नगरी भविष्यात गुन्हेगारांची नगरी होण्यास वेळ लागणार नाही.

गुटखा, वाळू आणि खून प्रकरणाने संतांच्या नगरीला बदनामीला सामोरे जावे लागले आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरील मजकूरावरुन प्रतिक्रिया देण्यावरुन दोन गटात वाद झाला. हा वाद तडजोड करुन मिटवण्यात आला असला तरी यामध्ये असणारी धुसफुस मात्र सुरुच होती. हे या हल्ल्यातील घटनेवरुन दिसून येते. या प्रकारणात दोन नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे यात राजकीय वर्चस्ववाद असल्याचे शहरातील नागरिक बोलू लागले.

वरात सुरु असताना भर चौकात ही घटना घडल्यामुळे शहरात तणावाची परीस्थिती निर्माण झाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देवून तपासाची सुत्रे वेगाने हालवून दोघांना ताब्यात घेतले. वास्ताविक पाहता तालुक्यात रोजंदारीचे प्रभावी साधन नाही तरी देखील पालकांकडून महाविद्यालयीन जीवनात उच्च दर्जाचे मोबाईल हातात दिल्यामुळे फेसबुक व व्हॉटसअॅप हे आधुनिक माध्यम हातात आल्यामुळे या तरुणांच्या हाताला काम मिळण्याऐवजी याच हाताने सोशलमिडीया माध्यमातून मतमतांतरे व्यक्त करु लागले. त्यामुळे मी मोठा की तू असा वाद सुरु झाला यापुर्वी वादावरच आपापल्या नेत्यांनी हे सर्व शांत करणे आवश्यक होते शिवाय पोलीसांनी देखील यामध्ये कडक कारवाई करुन भविष्यात असे प्रकार होणार याकडे लक्ष दिले. तर सर्वसामान्य मंगळवेढेकरांची शांतता अबाधित राहिले.

शहर व ग्रामीण भागाती याकडे शहरवासीयांबरोबर राजकीय नेत्यांनी देखील लक्ष घालणे आवश्यक बनले आहे. तालुक्यातील वाढत्या बेकारीमुळे तरुण वर्ग अवैद्य धंदा वाळु, मटका, जुगार याकडे वळून व्यसनाधीन बनून सोशल मिडीया याकड़े जास्त आकर्षला जाउन वाळू व्यवसायात कमी मेहनतीत जास्त पैसा मिळु लागल्यामुळे अलिकडच्या 7 ते 8 वर्षात 20 -25 वर्षातील तरुण प्रत्येक गांव, शहर मधे वाळु व्यवसायमधे गुंतला गेला.

महसुल विभागाने ज्या-त्या वेळी कारवाई केली असती संतांच्या नगरीत दहशहती वाढली नसती. अलीकडच्या काळात वाढत चालली असून समाजात शिक्षिताचे प्रमाण वाढून देखील कमी होण्या ऐवजी वाढू लागली आ. भारत भालके यांनी देखील दोन महिन्यापुर्वी विधानसभेत मंगळवेढ्याच्या गुन्हेवारी व सर्वसामान्याच्या शांततेविषयी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला.याकडे देखील पोलीसानी गांभीर्याने गेतले नाही. शहरातील तिसऱया डोळयाची स्थितीही नाजूक असून अशा घटना घडल्या की, व्यापाऱ्यांच्या सी.सी.टी.व्ही फुटेजचा आधार घ्यावा लागतो. शहरातील माना टाकलेल्या कॅमेरे चालू करुन शहरवासीयांची शांतता आबाधित ठेवत संताची नगरीचा लौकीक कायम ठेवण्यावर भर दयावा अशी अपेक्षा सर्वसामान्य मंगळवेढेकराकडून व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com