कोल्हापूरजवळ फरसाण कारखान्याला आग; कोट्यवधींचे नुकसान

nagaon fire
nagaon fire

नागाव - शिरोली औद्योगिक वसाहतीमधील शिराळे फुडस् ला मध्यरात्री आग लागल्याने सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. अत्याधुनिक फरसाण प्रोडक्शन मशिनरी, मिक्सर, ड्रायर, खाद्यतेल, डाळीचे पीठ व तयार खाद्यपदार्थ या आगीत जळून खाक झाले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या तीन अग्निशमन टँकर द्वारे पहाटे पाच पासून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तब्बल साडेपाच तासानंतर अग्निशमन दलाच्या चौदा जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. 

नगरसेवक किरण शिराळे व त्यांचे चिरंजीव विशाल हे या कंपनीचे मालक आहेत. कंपनीच्या मागील बाजूस असणार्‍या खोलीत चार कामगार राहतात. आज पहाटे यापैकी एका कामगाराने कंपनीत आग लागल्याची माहिती विशाल यांना दिली. त्यानंतर अग्निशमन दलास कळविण्यात आले. या आगीत कंपनीचा दुसरा व तिसरा मजला पुर्णपणे भस्मसात झाला आहे. दुसर्‍या मजल्यावर उत्पादन व तिसर्‍या मजल्यावर गोदाम असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com