बनावट नोटा आणि खऱ्या सोन्याचे धागे पुण्यात

Fake notes and Pure gold thread in Pune
Fake notes and Pure gold thread in Pune

श्रीगोंदे (नगर) : बनावट सोने देऊन राज्यासह देशातील अनेकांना गंडा घालणाऱ्या श्रीगोंद्यातील गुन्हेगारांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते. आता मात्र बनावट नोटा देऊन खरे सोने विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पारनेर व बारामतीकरांच्या करामती श्रीगोंदे पोलिसांनी उघड केल्या आहेत. बनावट नोटा सापडल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.


याबाबत पोलिस कर्मचारी अमोल कोतकर यांनी फिर्याद दिली. श्रीगोंदे पोलिसांनी सापळा रचून दोन लाख 83 हजारांच्या बनावट नोटा जप्त करून, त्या मोटारीतून घेऊन जाणारा आरोपी अतुल रघुनाथ आगरकर (जांभूळवाडी, सुपे, ता. पारनेर) याला अटक केली. आगरकरने या प्रकरणातील त्याचा साथीदार श्रीकांत सदाशिव माने (रा. बारामती) याचे नाव सांगितले. त्यालाही श्रीगोंदे पोलिसांनी आज पहाटे अटक केली. न्यायालयाने त्यांना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, बनावट नोटांच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असून, बारामतीतील माने याच्यासोबत तेथीलच आणखी काही आरोपी यात सहभागी असून, पाथर्डी आणि शिर्डी या भागात या टोळीतील काही सदस्य सक्रिय असण्याची शक्‍यता पोलिस व्यक्त करीत आहेत. अतुल आगरकर बनावट नोटा देऊन खरे सोने विकत घेण्याचा प्रयत्न करणार होता. त्यासाठी करमाळा व पंढरपूर येथील लोकांशी त्याचे बोलणेही झाले होते. सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश गावित यांनी माने यालाही अटक करून पुढच्या तपासाची दिशाही मिळवली आहे.

पुण्यातील महिला चालवते रॅकेट

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एक महिला या बनावट नोटा वितरित करते. ही महिला पोलिसाच्या घरातील असून, यापूर्वीही तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या तरी तीच या प्रकरणाची सूत्रधार असल्याची खात्रीशीर माहिती असून, त्यास पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. या टोळीने नगर व पुणे जिल्ह्यांतील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नोटा चलनात आणल्याचा पोलिसांचा संशय आहे. तसे असेल, तर नेमक्‍या किती नोटा चलनात आल्या आणि त्या कुठल्या भागात आहेत, याचा तपास करणे पोलिसांसाठी जिकिरीचे ठरणार आहे.
बनावट नोटा चलनात आणून या आरोपींनी अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्‍यता आहे.

ठिकठिकाणी या नोटा देऊन केवळ सोनेच नव्हे तर अनेक किमती वस्तू त्यांनी खरेदी केल्या असाव्यात, असा संशय आहे. हे आरोपी कोठे कोठे गेले व त्यांनी तेथे कोण्यात्या वस्तुंची खेरदी केली याचा तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com