सातारा: बनावट व्यक्ती उभी करून चिंचणेरमध्ये खरेदीखत 

प्रवीण जाधव
मंगळवार, 27 मार्च 2018

हणमंत शंकर पानस्कर, हणमंत शंकर डांगे, चंद्रकांत शंकर डांगे (सर्व रा. चिंचणेर- निंब), संदीप शिवराम मांडवे (रा. निगडी, ता. सातारा) व हणमंत शंकर शेडगे (रा. अंगापूर, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. 

सातारा : मृत व्यक्तीच्या जागेवर बनवट व्यक्ती उभी करून चिंचणेर निंब (ता. सातारा) येथील जमिनीचे खरेदीखत केल्याप्रकरणी पाच जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हणमंत शंकर पानस्कर, हणमंत शंकर डांगे, चंद्रकांत शंकर डांगे (सर्व रा. चिंचणेर- निंब), संदीप शिवराम मांडवे (रा. निगडी, ता. सातारा) व हणमंत शंकर शेडगे (रा. अंगापूर, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. 

कार्तिक मानसिंग पाटील (रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे. कार्तिक पाटील यांच्या वडिलांची चिंचणेर निंब येथे शेतजमीन होती. ती त्यांनी तोंडी कराराद्वारे काही जणांना कसण्यासाठी दिली होती. मानसिंग पाटील यांचे 2003 मध्ये निधन झाले. याची माहिती जमीन कसणाऱ्यांना होती, तरीही 2007 मध्ये वरील संशयितांनी त्यांच्या जमिनीचे खरेदीखत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात केले. या वेळी त्यांनी मानसिंग यांच्याऐवजी दुसरीच व्यक्ती उभी करून हे खरेदी केले. 

खरेदीखताद्वारे संबंधित जमीन हणमंत पानस्कर यांनी खरेदी केल्याचे दाखवविण्यात आले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर कार्तिक यांनी याबाबत फिर्याद दिली. सहायक निरीक्षक पोरे तपास करत आहेत.

Web Title: fake sale deed in Satara